|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » सिरिसेना यांना मोठा झटका

सिरिसेना यांना मोठा झटका 

श्रीलंकेतील संकट : राजपक्षे यांचा पराभव

कोलंबो

: सर्वोच्च न्यायालयाचा दणका बसल्याच्या दुसऱयाच दिवशी श्रीलंकेत राष्ट्रपती मैत्रिपाल सिरिसेना यांना बुधवारी आणखी एक झटका बसला आहे. संसदेत नवनियुक्त पंतप्रधान महिंदा राजपक्षे सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आहे. विरोधकांनी राजपक्षे सरकारच्या विरोधात अविश्वास प्रस्ताव मांडला होता, ज्यावर बुधवारी मतदान पार पडले आहे.  श्रीलंकेच्या संसदेचे सभापती कारू जयसूर्या यांनी मतदानाचा निकाल जाहीर करत पंतप्रधान महिंदा राजपक्षे यांच्या विरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव मंजूर झाल्याचे सांगितले. आवाजी मतदानाच्या आधारावर सरकारकडे बहुमत नसल्याचे स्पष्ट झाल्याचे जयसूर्या म्हणाले. मतदान होत असताना राजपक्षे यांचे समर्थक संसदेबाहेर निदर्शने करत होते. न्यायालयाने मंगळवारीच संसद विसर्जित करण्याचा सिरिसेना यांचा निर्णय रद्दबातल ठरविला आहे.

 याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक तयारींना देखील स्थगिती दिली आहे. सिरिसेना यांनी 26 ऑक्टोबर रोजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांना पदावरून बडतर्फ करत राजपक्षे यांना त्यांच्याजागी नियुक्त केले होते.  या नाटय़मय घटनाक्रमानंतर सिरिसेना यांनी संसद विसजिंत करत नव्याने निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला होता.

Related posts: