|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » म्हसवड नगरपालिकेने स्वच्छतेची टाकली कात

म्हसवड नगरपालिकेने स्वच्छतेची टाकली कात 

एल.के.सरतापे / म्हसवड

म्हसवड नगरपरिषदेने 2019 च्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानच्या धर्तावर शहरात स्वच्छ अभियानाची अंमलबजावणी सुरु केली आहे. या अभियानास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे दिसून येत आहे. या अभियानामुळे शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा पालिका प्रशासनाने निर्णय घेतला असून शहरातील रस्ते, गटारी, सार्वजनिक स्वच्छालये यांनी कात टाकल्याचे दिसत आहे.

म्हसवड पालिकेने स्वच्छ भारत अभियान या अत्यंत भव्य आणि महत्त्वाच्या स्पर्धेत उतरुन  कर्मचाऱयांकडून शहरात स्वच्छता करवून घेतली जात आहे. गेल्या महिन्यात स्वच्छ भारत अभियान कमेटीने म्हसवड शहरातील स्वच्छता गटारी, रस्ते, सार्वजनिक स्वच्छालये, घंटागाडी, व्यापारी संकुलातील सुका व ओला कचरा यांची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आदींची तपासणी केली जात आहे. तसेच सांडपाणी, बांधकामाचे साहित्य रस्त्यावर आहे का ? शहरात प्लास्टिक बंदी आहे का? तसेच उघडय़ावर कचरा पडू नये यासाठी शहरात ठिकठिकाणी छोटे कचऱयाचे डब्बे ठेवण्यात येवून सुका कचरा रस्त्यावर न टाकता डब्ब्यात व्यापारी कचरा टाकतात रस्त्यावरील अतिक्रमणे यांची पाहणी कमेटीने करुन शहरात राबवत असलेल्या या अभियानाची पाहणी करुन समाधान व्यक्त केले आहे. 

या स्वच्छ अभियान स्पर्धेमुळे रस्ते, सांडपाण्याची, गटारीची अवस्था ठीक करण्यात अली आहे, रस्ते चकाचक्क दिसत असून या स्वच्छतेमुळे नागरिकांत समाधान व्यक्त होत आहे. शासनानेही रस्त्यावर वा गटारीमध्ये कचरा टाकणाऱया व्यापारी व कुंटुबाला दंडाची तरतुद केली असून पालिकेने आत्तापर्यंत दोघांना दंड केला आहे. त्याचप्रमाणे रस्त्यावर वाळू वा बांधकाम साहित्य टाकणाऱयांनाही दंडाचा झटका दिल्याने नागरिक कचराकुंडीत वा कचरा गाडीत कचरा टाकतात.

यावर्षी बक्षीस नक्की मिळणार

शहरात तीन वेळा कचरा गाडी कचरा जमा करत असल्याने शहर चकाचक्क दिसत आहे. रस्ते, गटारी स्वच्छ रस्त्यावर कोठेही सांडपाणी येणार नाही याची काळजी स्वच्छता विभागाने घेतल्याने शहर स्वच्छ व निर्मळ झाल्याने यावर्षी नक्कीच बक्षीस मिळवेल असी चर्चा शहरात सुरु आहे.

Related posts: