|Sunday, March 29, 2020
You are here: Home » उद्योग » एअर इंडियाच्या 70 संपत्तांrची विक्री योजना

एअर इंडियाच्या 70 संपत्तांrची विक्री योजना 

वृत्तसंस्था /मुंबई :

तोटय़ात सुरू असलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या देशभरातील 70 पेक्षा अधिक निवासी आणि व्यावसायिक संपत्तीची विक्री करून 700-800 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी याबाबत माहिती दिली आहे. 16 शहरांमध्ये असलेली संपत्ती एमएसटीसीकडून ई-लिलाव करण्यात येणार आहे. या 70 संपत्तीच्या विक्रीतून सुमारे 700-800 कोटी रुपये मिळण्याचा अंदाज कंपनीच्या अधिकाऱयांनी व्यक्त केला आहे. यामध्ये निवासी आणि व्यावसायिक दोन्हीप्रकारच्या संपत्तीचा समावेश आहे. त्यातील काही संपत्ती याआदीही लिलावामध्ये आणली होती पण त्यासाठी लिलाव खरेदीदार मिळाले नाहीत.

एअर इंडियाची संपत्ती विक्री करण्याच्या योजनेला पूर्व युनायटेड प्रोग्रेसिव्ह अलायन्स (यूपीए) सरकारने 2012 मध्ये मंजूरी दिली होती. योजनेला एप्रिल 2014 ते मार्च 2021 पर्यंत 5 हजार कोटी रुपये उपलब्ध करण्याचे कंपनीचे लक्ष आहे.

कंपनीचे खासगीकरण करण्याचा प्रयत्नही सरकारने करून पाहिला होता. तथापि, ग्राहक न मिळाल्यामुळे खासगीकरण लटकले आहे. परिणामी संपत्ती विकण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Related posts: