|Monday, June 17, 2019
You are here: Home » Top News » हुबळीजवळ भीषण अपघात मृत मुंबईचे

हुबळीजवळ भीषण अपघात मृत मुंबईचे 

ऑनलाईन टीम / हुबळी :

हुबळीजवळ टृक आणि बसचा भीषण अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. या अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला असून 10 जण जखमी झाले आहेत. मृत प्रवासी मुंबईतील असून खासगी बसने कर्नाटकला जात होते.

आज पहाटे हा अपघात झाला असुन मुंबईहुन निघालेली खासगी बस हुबळीजवळील राष्ट्रीय महामार्गा 63 वर असताना त्यांना वाळू वाहून नेणाऱया ट्रकने जोरदार ढडक दिली. अपघातातील जखमींना तातडीने रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस देखिल घटनास्थळी दाखल झाले.