|Thursday, September 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » उपेंद्र कुशवाहांचा भाजपला अल्टीमेटम

उपेंद्र कुशवाहांचा भाजपला अल्टीमेटम 

बिहारमधील जागावाटपाचा मुद्दा : 30 नोव्हेंबरपर्यंत निर्णय घ्या, रालोआतील तणाव वाढला

वृत्तसंस्था/ पाटणा

 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी बिहारमधील रालोआत सुरू असलेल्या सुप्त संघर्षादरम्यान राष्ट्रीय लोकसमता पक्ष (रालोसप) आता आरपारच्या भूमिकेत आहे. पक्षाध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री उपेंद्र कुशवाह यांनी भाजपला 30 नोव्हेंबरपर्यंत जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्याचा इशारा दिला आहे.

भाजपने आमच्या पक्षाला सन्मानजनक जागा दिलेल्या नाहीत, भाजपचा सध्याचा प्रस्ताव मंजूर नाही. चर्चा  सुरू असून 30 नोव्हेंबरपूर्वी भाजपला यावर अंतिम निर्णय घ्यावा लागेल असे त्यांनी म्हटले आहे.

बिहारमध्ये भाजपने संजदसोबत 50-50 सूत्रांतर्गत जागावाटपाची घोषणा केली आहे. यांतर्गत भाजप आणि संजद राज्यात प्रत्येकी 17 जागा लढविणार आहेत. लोजपला 4 तर कुशवाह यांच्या पक्षाला 2 जागा देण्याची तयारी आहे. 

संजद-रालोसप वाद

रालोसप बाहेर पडल्याने रालोआवर कोणताही वाईट प्रभाव पडणार नसल्याचे विधान संजद प्रदेशाध्यक्ष वशिष्ठ नारायण सिंग यांनी केले आहे. त्यांच्या या विधानानंतर बिहारमध्ये पुन्हा राजकीय वाद उभा राहिला आहे.