|Sunday, December 15, 2019
You are here: Home » राष्ट्रीय » अर्जेंटिनाच्या बेपत्ता पाणबुडीचा वर्षभरानंतर लागला शोध

अर्जेंटिनाच्या बेपत्ता पाणबुडीचा वर्षभरानंतर लागला शोध 

ब्युनोस आयर्स

 अर्जेटिनाची एक वर्षापूर्वी बेपत्ता झालेली पाणबुडी ‘एआरए सॅन जुआन’चा शोध लागला आहे. अटलांटिक समुदात 800 मीटर खोल क्षेत्रात ही पाणबुडी आढळली आहे. जुआन पाणबुडी मागील वर्षी 15 नोव्हेंबर रोजी बेपत्ता झाली होती. यात चालक दलाचे 44 सदस्य कार्यरत होते.

खासगी कंपनी ओशियन इंफिनिटीने अर्जेंटिनाच्या वलदेस क्षेत्रानजीकच्या खोल समुदात जुआनचा शोध लावला आहे. शोधमोहिमेची जबाबदारी अर्जेंटिना सरकारने अमेरिकेच्या कंपनीला सोपविली होती. पाणबुडीचा शोध लागण्याच्या दोन दिवसांपूर्वी म्हणजेच गुरुवारी बेपत्ता नौसैनिकांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या स्मृती जागविणाऱया एका कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 

अध्यक्ष मॉरिसिओ माकरी यांनी दुःख व्यक्त करत पाणबुडीतील नौसैनिकांच्या कुटुंबीयांना उद्देशून या दुःखाच्या घडीला एकटं समजू नका, आम्ही या दुर्घटनेच्या कारणांचा शोध लावणार असे सांगितले आहे.

अर्जेंटिनाच्या पतागोनिया किनाऱयापासून 430 किलोमीटर अंतरावर असताना पाणबुडीशी अखेरचा संपर्क झाला होता. यानंतर पाणबुडी बेपत्ता झाली होती. बेपत्ता पाणबुडीच्या शोधासाठी 18 देशांची मदत घेण्यात आली, परंतु अपेक्षा गमावलेल्या अर्जेंटिनाने नव्याने शोधमोहीम सुरू केली होती.

Related posts: