दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घ्या : शरद पवार

ऑनलाईन टीम / मुंबई :
महाराष्ट्रात दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेऊन दुष्काळाबाबत निश्चित कृती कार्यक्रम हाती घेण्याची विनंती शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केली आहे. वेळीच योग्या ती पावले उचलून दुष्काळग्रस्त जनतेला दिलासा द्यावा अशा आशयाचं पत्र पवारांनी मुख्यमंत्र्यांना लिहले.
पत्रासोबत दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी कराव्या लागणाऱया उपाययोजनांची टिप्पणीही पवारांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली आहे. काहीच दिवसांपूर्वी राज्य सरकारनं राज्यातल्या 26 जिह्यातल्या 151 तालुक्मयांत दुष्काळ जाहीर केला आहे. राज्यात यंदा पाऊस कमी झाला आहे. हिवाळय़ाच्या सुरुवातीलाच पिण्याच्या पाण्याची तीव्र टंचाई भासू लागली आहे. परतीच्या पावसाने शेतकऱयांची पीकांची मोठय़ प्रमाणात हानी झाली आहे. त्यातच यंदा राज्यात दुष्काळाचे संकट आहे. पिण्याचे पाणी आणि जनावरांच्या चाऱयांच्या टंचाईमुळे पशुधनही धोक्मयात आले आहे. त्यामुळेच राज्य सरकारने यावर ठोस कृती कार्यक्रम हाती घ्यावा, अशी मागणी शरद पवार यांनी केली आहे.