|Monday, February 24, 2020
You are here: Home » Top News » 800 हून अधिक भाविकांनी केले ग्रंथाचे सामुदायिक पठण

800 हून अधिक भाविकांनी केले ग्रंथाचे सामुदायिक पठण 

ऑनलाईन टीम / पुणे :

श्री सद्गुरू गजानन महाराज की जय चा जयघोष. तब्बल 1800 हून अधिक भक्तांनी एकत्रित येत श्री गजानन विजय ग्रंथाचे केलेले सामुदायिक पठण. ग्रंथ पठणातून निर्माण झालेले आध्यात्मीक वलय. श्री गजानन महाराजांच्या जयघोषाने भक्तीमय झालेल्या या वातावरणात आळंदी कार्तिक वारीनिमित्त आयोजित श्री गजानन विजय ग्रंथाचा भव्य सामुदायिक पारायण सोहळा संपन्न झाला. या पारायण सोहळय़ात तब्बल 1800 हून अधिक भाविकांनी सहभाग घेतला.

न्यू इंग्लिश स्कूल रमणबाग येथे श्री गजानन महाराज सेवाधारी न्यास या संस्थेतर्फे पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. यावेळी आध्यात्मकि क्षेत्रात उल्लेखनिय कार्य करणारे उज्जैनचे डॉ. विठ्ठल पागे यांना श्री गजानन महाराज सेवाधारी भूषण पुरस्काराने गौरविण्यात आले. स्वामी माधवानंद उर्फ डॉ. माधव नगरकर यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी माधुरी पागे, संस्थेचे अध्यक्ष मदन कस्तुरे व संस्थेचे इतर पदाधिकारी उपस्थित होते. शाल, श्रीफळ, सन्मानपत्र व रोख रक्कम अकरा हजार रुपये व गजानन महाराजांची प्रतिमा असे पुरस्काराचे स्वरूप होते. पुरस्कार सोहळ्याचे यंदाचे तिसरे वर्ष आहे.

800 हून अधिक भाविकांनी केले ग्रंथाचे सामुदायिक पठण

डॉ. माधव नगरकर म्हणाले, जेव्हा मी पहिल्यांदा गजानन महाराजांच्या विजय ग्रंथाचे वाचन करायला घेतले तेव्हा त्या ग्रंथामुळे मनात स्फुरण चढू लागले. त्याची प्रेरणा इतकी होती की 19 दिवसात 19 अध्यायाचे विवरण लिहून झाले आणि एका वर्षात त्याचे पुस्तक लिहून झाले. जे अध्यात्मात आणि परमार्थात सांगितले ते जर एका कोणाच्या जीवनात पहायचे असेल तर ते गजानन महाराजांच्या जीवनात पाहता येईल. महाराजांची फक्त पोथी वाचू नका तर प्रत्यक्ष त्यांच्या स्थळांना भेट द्या. त्यामुळे आध्यात्मकि प्रेरणा मिळेल.

डॉ. विठ्ठल पागे, हा पुरस्कार सोहळा नाही तर कृतज्ञता सोहळा आहे. आयुष्यभर एक ध्यास घेवून जगल्यावर एका विशिष्ट टप्प्यावर आल्यानंतर आईने पाठिवर हात ठेवून आशीर्वाद द्यावा तसा हा सन्मान आहे. सद्गुरू ही आध्यात्मीक क्षेत्रातील आई असते. माझ्या आईकडून मला हा आध्यात्मीकतेचा वारसा मिळाला आहे. माझ्या जीवनात संतांची मांदियाळी आली परंतु माझ्या सद्गुरूंना मी विसरलो नाही, असेही त्यांनी सांगितले. पारायण सोहळ्यादरम्यान लायन्स क्लब ऑफ पुणे, सहकारनगर यांच्यावतीने महिलांकरीता मोफत ब्रेस्ट कॅन्सर तपासणी व जगजागृतीचे आयोजन करण्यात आले. यावेळी 100 हून अधिक महिलांची तपासणी करण्यात आली.

Related posts: