खशोगी हत्येप्रकरणी मंगळवारी येणार सीआयएचा अहवाल

वॉशिंग्टन
सौदी पत्रकार जमाल खशोगी यांच्या हत्येप्रकरणी सीआयए मंगळवारी स्वतःचा अहवाल सादर करणार असल्याची माहिती अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे. या प्रकरणी आपण सीआयए प्रमुख जीना हास्पेल यांच्याशी चर्चा केल्याचे ट्रम्प यांनी सांगितले आहे. एका पत्रकाराची हत्या होणे दुर्दैवी आहे. सीआयए अद्याप कोणत्याही निष्कर्षावर पोहोचलेली नाही, मंगळवारी यंत्रणेचा अहवाल मिळणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे. सीआयएने हत्येसाठी सौदी अरेबियाचा युवराज सलमानला दोषी मानल्याचा दावा द वॉशिंग्टन पोस्टने केला होता. सौदी अरेबियाने हा दावा फेटाळला आहे.
सलमा यांचे टीकाकार आणि वॉशिंग्टन पोस्टचे पत्रकार खशोगी यांची 2 ऑक्टोबर रोजी इस्तंबूल येथील सौदी अरेबियाच्या दूतावासात निर्घृण हत्या करण्यात आली होती.
Related posts:
Posted in: राष्ट्रीय