|Thursday, November 21, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा बेळगाव चोर्ला घाट मार्गे रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ

गोवा बेळगाव चोर्ला घाट मार्गे रस्त्याच्या दुरुस्तीला प्रारंभ 

वाळपई / प्रतिनिधी

गोवा व कर्नाटक दरम्यान महत्वाचा समजला जाणाऱया।  चोर्ला घाट परिसरातील रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली होती. यामुळे अनेक स्तरावर प्रवाशांनी नाराजी व्यक्त करण्यात आल्यानंतर शेवटी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाला जाग आली असून गेल्या दोन दिवसांपासून सदर रस्त्याची दुरुस्ती  युध्दपातळीवर हाती घेण्यात आली आहे. डिसेंबर पर्यंत ज्याठिकाणी रस्ता खराब झालेला आहे त्याठिकाणी हाँटमिक्स लेप चढवून रस्ता पूर्वीच्या स्थितीत करण्यात येणार असल्याची माहिती संबंधित खात्याच्या सूत्रांनी दिली आहे .

सर्वजनिक बांधकाम खात्याच्या रस्ता विभागाने या रस्त्याची डागडुजी हाती घेतल्याने प्रवासी व नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून हा रस्ता प्रवासी वर्गासाठी अत्यंत सोयीस्कर करावा अशा प्रकारची मागणी करण्यात आलेली आहे. यासंदर्भाची माहिती अशी की गोवा व कर्नाटक दरम्यान अनेक कारणाखाली वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. गोवेकरांसाठी बेळगाव शहराची बाजारपेठ अत्यंत फलदायी ठरत असल्याने शनिवारी रविवारी व इतर सुट्टीच्या दिवशी मोठय़ा प्रमाणात गोवेकर बेळगाव शहरात वेगवेगळय़ा प्रकारच्या खरीदसाठी जात असतात.

 सध्यातरी साखळी केरी मार्गे चोर्ला घाट परिसरातून जाणारा रस्ता हा अत्यंत कमी अंतराचा असल्याने व रस्त्याच्या दोन्ही बाजूला पूर्णपणे झाडे असल्याने हा रस्ता प्रवासी वर्गा?साठी अत्यंत सोयीस्कर ठरत आहे. यामुळे या दरम्यानच्या रस्त्यावर वाहतुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे .पावसाळय़ापूर्वी चोर्ला घाट परिसरात गोवा हद्दीपर्यंत अनेक ठिकाणी रस्त्याची पूर्णपणे दयनीय अवस्था झाली होती. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते व त्यामुळे वाहनचालकांना मोठय़ा प्रमाणात डोकेदुखीला सामोरे जावे लागत होते. सदर रस्त्याची दुरुस्ती त्वरित हाती घ्यावी अशा प्रकारची मागणी सातत्याने प्रवासीवर्ग करताना दिसत होते. याबाबतच्या बातम्या अनेक वेळा वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाल्यानंतर याची गंभीर दखल घेत सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन दिवसापासून या रस्त्याची आवश्यक ठिकाणी दुरुस्ती हाती घेतली आहे. खास करून वळणावर खराब झालेला रस्ता व पडलेले खड्डे बुजविण्याचे काम सुरू झाले असून आणखी आठ दिवसांनी रस्त्याची डागडुजी पुर्ण होणार असल्याचे अधिकाऱयांनी स्पष्ट केले आहे. त्?याचप्रमाणे ज्या ठिकाणी रस्त्याची दुरुस्ती हाती घेण्यात आली आहे सदर रस्त्यावर पुन्हा एकदा हॉटमिक्स घालण्यात येणार असून सदर काम डिसेंबरच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत पूर्ण होणार असल्याचे अधिकारी वर्गाचे म्हणणे आहे.

 दरम्यान वर्षाच्या शेवटच्या टप्प्यात व नववर्ष वेळी कर्नाटक भागातून गोव्यामध्ये नूतन वर्षाचा आनंद लुटण्यासाठी मोठय़ा प्रमाणात पर्यटक येत असतात. यामुळे सदर रस्त्याची दुरुस्ती जानेवारीच्या पूर्वी करणे अत्यंत गरजेचे असून अन्यथा मोठय़ा प्रमाणात येणाऱया पर्यटकांना खड्डय़ाच्या माध्यमातून गोव्यात प्रवेश करावा लागणार आहे. दरम्यान या संदर्भात खात्याच्या अधिकाऱयांशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की डिसेंबरच्या शेवटच्या आठवडय़ापूर्वी या रस्त्यावर आवश्यक त्याठिकाणी हॉटमिक्स डांबरीकरण करण्यात येणार असून कोणत्याही अवस्थेत नागरिकांसाठी डोकेदुखी होणार नाही याची विशेष काळजी घेण्यात येणार असल्याचे यावेळी त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: