|Monday, August 19, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » गुजरात दंगलसंबंधी याचिकेवरील सुनावणी लांबणीवर

गुजरात दंगलसंबंधी याचिकेवरील सुनावणी लांबणीवर 

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

गुजरात राज्यात 2002 मध्ये झालेल्या दंगलींमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना क्लिन चिट देण्याच्या निर्णयावरोधात सर्वोच्च न्यायालयात सादर करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली आहे. आता ही सुनावणी 26 नोव्हेंबरला ठेवण्यात आली आहे. न्या. ए. एम. खानविलकर यांच्या नेतृत्वातील खंडपीठासमोर ही याचिका आहे.

सदर याचिका त्या दंगलीत ठार झालेले काँगेसचे माजी नेते एहसान जाफरी यांच्या पत्नी झकिया यांनी सादर केली आहे. मोदी यांचा या दंगलीत कोणत्याही प्रकारे हात असल्याचा पुरावा नसल्याने चौकशी समिती, कनिष्ठ न्यायालय आणि गुजरात उच्च न्यायालयाने त्यांना क्लिन चिट दिली होती. गुजरात उच्च न्यायालयाच्या या निकालाविरोधात झकीया यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली आहे.