|Tuesday, January 28, 2020
You are here: Home » आवृत्ती » सांगली » सोलापुरी भाजपात ‘ज्वालामुखा’rचा उद्रेक

सोलापुरी भाजपात ‘ज्वालामुखा’rचा उद्रेक 

प्रतिनिधी/ सोलापूर

नेहमी ‘या’ ना ‘त्या’ कारणांमुळे गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत चर्चेत असलेली सोलापूरी भाजप पुरती हादरली आहे. या पक्षाच्या वर्तुळात जणू ‘ज्वाला’मुखी   बाहेर पडला आहे. येथील राजकीय पटलावर खळबळ येथे माजली आहे. त्याला कारणदेखील तसेच आहे. जिह्याचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या गटाचे महापालिकेतील भाजपाचे ज्येष्ठ नगरसेवक सुरेश पाटील यांनी आपल्यवरील विष  प्रयोग करणाऱयांची नावे पत्रकार परिषद घेवून उघड केल्याने शहर भाजपात जणू   जमीन सरकली आहे.

 वास्तविक चौकशी अंती खरे विष प्रयोग करणारे कोण? यामधील सत्य समोर येणार असले तरी पाटील यांनी पेलेल्या गौप्यस्फोटामुळे शहर भाजपामधील बडे प्रस्थापित आणि त्यांचा परिवाराच्या पायाखालची जमीन सरकली आहे. कारण या संबंधीतांच्या भोवती पोलीसांच्या चौकशीचा फास  येणार आहे. चौकशीच्या ससेमिऱयाला त्यांना समोरे जावे लागणार आहे. चौकशीत ‘दूध का दूध पाणी का पाणी’ हे होणार असले तरी या संबंधीतांवर पाटील यांनी आरोप केला आहे.

  विशेष म्हणजे सुरेश पाटील यांनी विष प्रयोगासंबंधी जी नावे उघड केली आहेत. त्यामध्ये शिवसेनेचे नगरसेवक सुनिल कामाठी हे एकमेच पालकमंत्री गटाचे आहेत. बाकी चौघेजण हे सहकारमंत्री सुभाष देशमुख गटाचे आहेत हे उल्लेखनीय आहे.

  महापौर शोभा बनशेट्टी, त्यांचे पती श्रीशैल बनशेट्टी, भाजप शहराध्यक्ष प्रा. अशोक निंबर्गी, राज्य शिखर बँकेचे संचालक अविनाश महागावकर आणि नगरसेवक सुनील कामाठी यांनीच माझ्यावर विष प्रयोग केला, असा खळबळजनक आरोप महापालिकेतील भाजपचे माजी सभागृहनेते व  नगरसेवक सुरेश पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत केला. पाटील यांनी केलेल्या आरोपामुळे भाजपच्या गोटात आणि शहरात दिवसभर चर्चेचा विषय बनला होता.

6 डिसेंबर 2017 रोजी अस्वस्थ वाटू लागल्याने नगरसेवक सुरेश पाटील यांना उपचारासाठी मार्कंडेय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचारानंतर प्रकृती नाजूक झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुणे व नंतर मुंबईला हलविले होते. मुंबईत बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारादरम्यान पाटील यांच्यावर विषप्रयोग झाल्याचे उघड झाले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार पाटील यांचे चिरंजीव बिपीन पाटील यांनी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली होती. पालकमंत्री विजयकुमार देशमुख यांच्या पाठपुराव्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अधिक चौकशीसाठी हे प्रकरण सीआयडीकडे दिल्याची घोषणा केली होती. पण 9 महिन्यात सीआयडीची चौकशी रखडली. त्यामुळे  सभागृहनेते संजय कोळी यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली होती.

स्वतःवर झालेल्या थेलियम विषबाधा प्रकरणी भाजपचे सुरेश पाटील यांनी भाजपातील बडय़ा नेते मंडळी असणाऱया संशयितांची नावे असलेला जबाब जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात दिला आहे. मात्र ,जबाब देऊनही आपली फिर्याद का दाखल करुन घेतली जात नाही, असा सवाल पाटील यांनी उपस्थित केला आहे. काही दिवसांपूर्वी सर्वपक्षीय मोर्चा निघाल्यानंतर शहर पोलिसांनी सुरेश पाटील यांच्याशी संवाद साधून या प्रकरणाची अधिक माहिती घेतली. त्यानंतर सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषबाधाप्रकरणी जोडभावीपेठ पोलिसांनी तपास सुरू केला असता, संशयितांची नावे सांगण्यास सुरेश पाटील यांनी मुदत मागितली होती. त्यानंतर विषबाधाप्रकरणातील संशयितांचा नावे आपल्या जबाबात जोडभावी पेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक केडगे यांना दिली.

दोन्ही मंत्र्यांवर संशय नाही

पालकमंत्र्यांनी मला वेळोवेळी मदतच केली आहे. त्यांच्यावर मी संशय घेऊ सुद्धा शकत नाही. त्याशिवाय सहकारमंत्री सुभाष देशमुख यांचाही विष प्रयोग करण्यात थेट संबंध नसावा. मात्र त्यांच्या बगलबच्यांनी हे कृत्य केले आहे. दोन्ही मंत्र्यांच्या मागेपुढे फिरणाऱयांनीच मला संपवायचा प्रयत्न केला. पोलिसांना मी दिलेला जबाब ग्राह्य धरुन तात्काळ गुन्हा दाखल करणे अपेक्षित होते. पण जबाबातील नावे मोठय़ा लोकांची असल्यामुळे पोलिसांनी अद्याप गुन्हा दाखल करुन घेण्यास टाळाटाळ करीत आहेत, असा आरोप सुरेश पाटील यांनी केला.

सर्व प्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यास सज्ज

नगरसेवक सुरेश पाटील हे माझे खूप जुने मित्र आहेत. मित्रानेच माझ्यावर संशय व्यक्त केल्याने मला खूप दुखः झाले. पाटील यांनी केलेल्या आरोपात कोणतेही तथ्य नसून पूर्णपणे राजकीय सूडबुद्धीनेच आरोप केल्याचे उघडपणे दिसतेय. पोलीस चौकशीला सुरू झाले असून जे सत्य आहे ते बाहेर येण्याची गरज आहे. आम्ही चारहीजण सर्वप्रकारच्या चौकशीला सामोरे जाण्यात सज्ज आहोत.

    प्रा. अशोक निंबर्गी (भाजप शहराध्यक्ष)

   चार दिवसात नावे बदलली

मी व माझी पत्नी महापौर शोभा बनशेट्टी यांचाही विषप्रयोगात हात असल्याचा आरोप पाटील यांनी केला. गेल्या 75 वर्षापासून बनशेट्टी घराणे सामाजिक व राजकीय क्षेत्रात सेवा बजावत आहे. बनशेट्टी घराण्यातील लोक असे कृत्य करतात यावर लहान मुलगाही विश्वास ठेवणार नाही. पाटलांनी स्वतःची सद्सद् विवेकबुद्धी जागृत ठेवून आरोप करायला हवे होते. परंतु काही दिवसांपूर्वी संशयीतांची नावे वेगळी होती. पण दिवाळीच्या काळात काही लोकांनी लक्ष्मी नारायण दर्शन केल्याने यातील नावे चार दिवसात बदलली आहेत. याप्रकरणी उद्या पोलिसांनी चौकशीसाठी बोलावले आहे. पोलिसांना आम्ही पूर्णपणे सहकार्य करण्यास तयार आहे.

                                  श्रीशैल बनशेट्टी(मिस्टर महापौर)

 

बोलविता धनी कोण याचा शोध घ्यावा

सुरेश पाटील यांनी आमच्यावर केलेल्या आरोपातून त्यांची अक्कलहुशारी दिसून येते. राजकारणात वादविवाद होत असतात परंतु इतक्या खालच्या स्तरावर जाऊन घाणेरडे राजकारण करतील यावर अद्यापही विश्वास बसत नाही. त्यांनी कोणत्या पुराव्यानिशी आरोप केले हे पाटलांनी सिद्ध करावे. एक महिला महापौर असल्याने अनेकांना बघवत नाही. त्यांनी बहुधा त्यांचे कान भरले आहेत. परंतु हा बोलविता धनी कोण याचा पोलिसांनी ताबडतोड शोध घेतले पाहीजे.

                                 शोभा बनशेट्टी (महापौर, सोलापूर)

 

तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप

आमचे सहकारी सुरेश पाटील यांनी केलेला आरोप बिनबुडाचे आणि तथ्यहीन आहे. नेमके काय विचार करुन त्यांनी आरोप केला आहे हे कळत नाही. त्यांनी विवेकबुद्धी जागृत ठेवून पत्रकार परिषद घ्यायला हवे होते. पोलीसांनी याप्रकरणी चौकशी सुरू केली असून त्यांच्या प्रत्येक चौकशीला सामोरे जाईन.

  अविनाश महागावकर (संचालक, राज्य शिखर बँक)

 

पोलीस दबावाखाली काम करणार नाहीत

महापालिकेचे नगरसेवक सुरेश पाटील यांच्यावर झालेल्या विषप्रयोग प्रकरणात सोमवारी पाटील यांनी पत्रकार परिषदेत राजकीय क्षेत्रातील दिग्गजांच्या नावे घेतली आहेत. या प्रकरणात ‘मेरिट’ प्रमाणेच काम करण्यात येणार आहे. पाटील यांनी सांगितलेल्या प्रत्येकांची कसून चौकशी करण्यात येईल, चौकशीत जे काही सत्य बाहेर येईल, त्याप्रमाणे पोलिसांकडून कारवाई होईल.

Related posts: