|Sunday, January 26, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » आंचिमच्या इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन ‘खरवस’ या गोमंतकीय लघुपटाने

आंचिमच्या इंडियन पॅनोरमाचे उद्घाटन ‘खरवस’ या गोमंतकीय लघुपटाने 

यशवंत सावंत/ पणजी

आंचिम 2018मध्ये यावर्षी गोव्यातून ‘खरवस’ या एकाच लघुपटाची निवड झाली असून गोमंतकीयांसाठी अभिमानाची गोष्ट म्हणजे बुधवार दि. 21 रोजी इंडियन पॅनोरामाचे उद्घाटन याच लघुपटाने होणार आहे. हा लघुपट मराठी भाषेमध्ये असून याचे दिग्दर्शन फ्ढाsंडा येथील युवक आदित्य जांभळे यांनी तर निर्मिती श्री महाळसा प्रॉडक्शन फ्ढाsंडा आणि मधुकर जोशी यांनी केली आहे. या लघुपाटाची सर्व शूटींग गोव्यातच झाली असून मराठी चित्रपट श्रृष्टीतील दिग्गज व नामांकीत अभिनेत्यांनी यामध्ये काम केले आहे अशी माहिती दिग्दर्शक आदित्य जांभळे यांनी दिली.

मातृत्व विषयावर आधारित लघुपट

‘खरवस’ या लघुपटाचे लेखन आदित्य जांभळे यांनी केले असून हा लघुपट ‘मातृत्व’ या विषयावर आधारित आहे. ज्यावेळी स्त्री बाळंतपणाची असते त्यावेळी तिची सर्वजण काळजी घेतात. तीला काय हवं नको ते बघतात. गर्भात बाळाचे पोषण चांगल्यारितीने कसे होईल यासाठी घरातील सर्वच मंडळी काळजी घेत असते. बाळाची येण्याची चाहूल लागल्यावर सर्वांची नजर त्याच्यावर असते. बाळ कसे दिसणार याची कल्पनाही बाळ येण्याअगोदरच करतात. आशावेळी घरात फ्ढक्त आनंदी वातावरणच पाहायला †िमळते.

मेलेलं बाळ जन्मल्यावर स्त्रीच्या पुढील प्रवासाचे चित्रण ‘खरवस’मध्ये

आई होणं हा स्त्रीचा दुसरा जन्म असतो असे म्हटले जाते. समजा बाळ जन्मतःच मेलेलं असेल तर त्या स्त्रीला समाजात काय स्थान असते व तीला कशाप्रकारची वागणूक दिली जाते हे या लघुपटात दाखवले आहे. अशा स्त्रीसमोर कशाप्रकारच्या समस्या येतात व कोणकोणत्या समस्यांना सामोरे जावे लागते हे या लघुपटात आहे. कोणताही पुरुष स्त्रीच्या समस्या समजू शकत नाही व त्यामुळे त्यांनी त्यावर भाष्य करणे चुकीचे आहे. अर्थात तो स्त्रीयांच्या समस्यांवर अजुनही सर्वांसमोर बोलत नाही ही विद्यमान समाजस्थिती आहे.

फ्ढ्रान्स येथील ‘कांस’ महोत्सवातही लघुपट प्रदर्शित

हा लघुपट एकूण 38 मिनिटांचा आहे. बुधवार दि. 21 राजी आयनॉक्स स्क्रीन 1 मध्ये हा लघुपट सकाळी 11 वा. दाखविण्यात येईल. या लघुपटाचे वैशिष्टय़ म्हणजे फ्ढ्रान्समध्ये कांस येथे होणाऱया जगातल्या सर्वात मोठय़ा ‘कांस’ महोत्सवातही हा लघुपट दाखविण्यात आला होता. यावरुन या लघुपटाचा दर्जा आपल्या लक्षात येईल. बहुतेक लघुपटांमध्ये गीत नसतात पण या लघुपटात गीतही आहे. कलाकरांचे वैशिष्टय़ म्हणजे सलग 16 तास एक दिवस न थांबता शूटींग केली केली. हा लघुपट तयार करण्यासाठी 7 ते 8 महिने लागल्याचे चित्रपट दिग्दर्शक आदीत्य जांभळे यांनी सांगितले.

गोमंतकीय कलाकारांनीही साकारल्या महत्वाच्या भूमिका

‘खरवस’ या लघुपटात मराठी चित्रपट श्रृष्टीतील दिग्गज अभिनेत्यांनीही मुख्य भूमिका साकारल्या आहेत. यामध्ये स्वाती बोवाळेकर, संदेश कुलकर्णी, विणा जामकर तर वर्धन कामत, दिलीप देसाई, केतन जाधव, पौर्णिमा नाईक या गोमंतकीय कलाकारांनीही महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत. लघपुटाला संगीत सुष्मित लिमये यांनी व संपादन आदित्य जांभळे आणि आमोघ बर्वे यांनी केले आहे.

आदित्य जांभळेला ‘राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार’

यापुर्वी 2017 मध्ये आदित्य जांभळे यांनी ‘आबा एकताय ना’ हा मराठी लघुपट दिग्दर्शित केला होता. या लघुपटासाठी जांभळे याला भारताचे माजी अध्यक्ष प्रणव मुखर्जी यांच्याहस्ते दिग्दर्शनासाठी ‘राष्ट्रीय सुवर्णकमळ पुरस्कार’ देण्यात आला होता. गोव्याचे हे पहिले सुवर्णकमळ होते. कोकणीसाठी राखीव असल्याने एकाची निवड झाल्यावर ते पुर्वी कोकणी चित्रपटांना मिळाले होते पण ‘आबा एकताय ना’ हा लघुपट कुठल्याही राखीव जागेमध्ये नव्हता तर सर्व भाषांमधून एकूण 262 चित्रपट या स्पर्धेत होते व त्यात आपल्याला हा पुरस्कार मिळाल्याचे आदीत्य जांभळे यांनी सांगितले.

Related posts: