|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » वर्ध्यातील पुलगावमधील दारूगोळा डेपोत भीषण स्फोट;चार जणांचा मृत्यू

वर्ध्यातील पुलगावमधील दारूगोळा डेपोत भीषण स्फोट;चार जणांचा मृत्यू 

ऑनलाईन टीम / वर्धा :

वर्ध्यातील पुलगावच्या केंद्रीय दारुगोळा भांडारात आज सकाळी भीषण स्फोट झाला. स्फोटके निकामी करताना स्फोट झाल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत दोघांचा मृत्यू झाला असून सहा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.

देशातील सर्वात मोठा शस्त्रास्त्र साठा वर्ध्यातील पुलगावमध्ये आहे. दारुगोळा भांडाराचा हा परिसर तब्बल 28 किमीमध्ये पसरला आहे. पुलगावमध्ये दोन वर्षांपूर्वी म्हणजेच 2016 मध्ये स्फोट होऊन आग लागली होती, ज्यात 16 जवान शहीद झाले होते. आता पुन्हा या ठिकाणी स्फोटके निकामी करताना स्फोट झाला आहे. या घटनेनंतर आजूबाजूच्या परिसरातील नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. घटनास्थळी प्रशासन, लष्करी अधिकारी दाखल झाले आहेत.