|Monday, September 16, 2019
You are here: Home » Top News » मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण- तुलसी विवाह थाटात

मंगलाष्टकांच्या सुरावटींमध्ये श्रीकृष्ण- तुलसी विवाह थाटात 

ऑनलाईन टीम / पुणे :

वधू-वरांवर अक्षता व पुष्पवर्षाव करणाऱया पारंपरिक वेशातील महिला आणि श्रीकृष्णाची मूर्ती व तुलसीवृंदावन डोक्मयावर घेऊन काढलेली वरात. अशा थाटात पारंपरिक पद्धतीने तुलसीविवाह सोहळा पार पडला. वधू-वरांना आर्शिवाद देण्यासाठी उपस्थित मंडळी श्रीकृष्ण-तुलसी चरणी नतमस्तक होत, आपल्या मनोकामना त्यांच्याकडे मांडत होती. तर, उत्तम आरोग्य आणि सुखी समाज याकरीता पुणेकरांनी प्रार्थना देखील केली.

निमित्त होते, श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळाच्यावतीने ट्रस्टच्या 126 व्या वषी मंडईतील साखरे महाराज मठ येथे आयोजित तुलसीविवाह सोहळय़ाचे. यावेळी ट्रस्टचे सुनील रासने, महेश सुर्यवंशी, बाळासाहेब सातपुते, उल्हास भट, विजयराव चव्हाण यांसह महिलावर्ग मोठया संख्येने उपस्थित होता. कार्यक्रमाचे यंदा 36 वे वर्ष होते. शामसुंदर पारखी शास्त्री यांनी विवाहसोहळय़ाचे पौरोहित्य केले. दगडूशेठ गणपती मंदिरामध्ये सकाळी श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन झाल्यानंतर पारंपरिक पद्धतीने मिरवणुकीला प्रारंभ झाला.

चौका-चौकात मिरवणुकीचे स्वागत करीत श्रीकृष्णाच्या मूर्तीचे पूजन करण्यात आले. मिरवणुकीत फुगडया घालत फेर धरुन महिलांनी मोठया संख्येने सहभाग घेतला. प्रभात बँड आणि दरबार ब्रास बँड देखील मिरवणुकीमध्ये सहभागी झाले होते. रांगोळीच्या पायघडय़ांनी मिरवणुकीचा संपूर्ण मार्ग सुशोभित करण्यात आला होता. दगडूशेठ गणपती मंदिरापासून निघालेल्या मिरवणुकीचा समारोप समाधान चौक-रामेश्वर चौक-टिळक पुतळा मंडईमार्गे साखरे महाराज मठात झाला. त्यानंतर आयोजित विवाहसोहळय़ाला पुणेकरांनी मोठय़ा संख्येने हजेरी लावली.