|Thursday, August 22, 2019
You are here: Home » उद्योग » उत्तर प्रदेशात 121 साखर कारखाने कार्यान्वित होणार

उत्तर प्रदेशात 121 साखर कारखाने कार्यान्वित होणार 

लखनौ

 उत्तर प्रदेशात बंद पडलेले 121 साखर कारखाने पुन्हा कार्यान्वित करण्यात येणार आहेत, अशी घोषणा मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे. यापैकी 85 कारखाने या मोसमात पुन्हा सुरू करण्यात आले आहेत. ऊर्वरित कारखानेही लवकरच सुरू करण्यात येतील असे प्रतिपादन त्यांनी केले. शेतकऱयांचे शोषण होणार नाही याची दक्षता आपण घेत आहोत. राज्यात साखर उद्योगाला प्रोत्साहन देण्यात येत असून शक्य ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.