|Saturday, February 22, 2020
You are here: Home » Top News » पेटीएमची एलआयसीसह धोरणात्मक भागीदारी

पेटीएमची एलआयसीसह धोरणात्मक भागीदारी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

आपला विमा प्रीमियम पेमेंटचा पोर्टफोलिओ विस्तारत भारतातील सर्वात मोठी डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमची मालकी असलेल्या वन97 कम्युनिकेशन्स लिमिटेडने भारतीय जीवनविमा निगम (एलआयसी) या देशातील सर्वात मोठय़ा जीवनविमा कंपनीशी धोरणात्मक भागीदारी केली आहे. या सहयोगामुळे, ग्राहक आता एक मिनिटापेक्षा कमी वेळात या मंचावरून एलआयसी प्रीमियम सहजपणे भरू शकतील.

हा मंच एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेन्शयिल लाईफ, रिलायन्स लाईफ, मॅक्स लाइफ इन्शुरन्स, एचडीएफसी लाईफ, टाटा एआयए, एसबीआय लाईफ, आदित्य बिर्ला सन लाईफ, कॅनरा एचएसबीसी लाईफ इन्शुरन्स, श्री राम लाईफ आणि स्टार हेल्थ सहित 30 पेक्षा जास्त विमा कंपन्यांचे प्रीमियम सहजगत्या ऑनलाइन भरण्यासाठीची सुविधा प्रदान करतो. पेटीएम हा झपाट्याने ऑनलाइन विमा प्रीमियमच्या पेमेंटसाठी वापरकर्त्यांचा पसंतीचा मंच बनत चालला आहे आणि या वर्षाच्या अखेरपर्यंत 30-40 दशलक्ष पॉलिसींचा रनरेट गाठण्याचे त्यांचे अनुमान आहे.

पेटीएमचे सीओओ किरण वासिरेड्डी म्हणाले,‘आपल्या देशात विम्याचे प्रीमियम सामान्यपणे ऑफलाइन पद्धतीने भरले जाते. आमच्या ग्राहकांना पेमेंटचा सुलभ अनुभव मिळावा अशी पेटीएममध्ये आमची इच्छा आहे. एलआयसी आणि इतर आघाडीच्या विमा प्रदात्या कंपन्यांशी आम्ही केलेल्या भागीदारीमुळे आमच्या लाखो वापरकर्त्यांना पेटीएम ऍपवरून पसंतीची पेमेंट पद्धत वापरुन आपली विमा पॉलिसीचे नूतनीकरण करण्याची सुलभ आणि वेगवान पद्धत उपलब्ध होईल.

Related posts: