|Saturday, October 19, 2019
You are here: Home » Top News » नऊ चिमुरडय़ांचा बलात्कार अन् हत्या करणाऱ्या आरोपीला अटक

नऊ चिमुरडय़ांचा बलात्कार अन् हत्या करणाऱ्या आरोपीला अटक 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दिल्लीतील 20 वर्षांच्या तरुणाने अमानुषतेचा कळस गाठल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तीन ते सात वर्ष वयोगटातील किमान नऊ चिमुरड्यांवर बलात्कार करुन आरोपीने त्यांची हत्या केली. घृणास्पद बाब म्हणजे बलात्कारापूर्वी तो पीडतेचे पाय तोडत असे. मागील दोन वर्षात दिल्लीसह चार शहरांमध्ये या सिरीअल रेपिस्टने धुमाकूळ घातला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्राममधील झोपडपट्टीत राहणाऱया तीन वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करुन हत्या केल्याप्रकरणी सुनिलकुमारला सोमवारी झांसीतून अटक करण्यात आली. त्यानंतर चौकशीमध्ये त्याने तब्बल नऊ जणींना आपल्या वासनेची शिकार केल्याची कबुली दिली. आरोपीला कोर्टाने आठ दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे. आरोपीने एका ठिकाणी नोकरी न करता विविध ठिकाणी रोजंदारीवर काम करत ही गैरकृत्ये केली. मोफत अन्नछत्रांमध्ये आलेल्या लहान मुलींना पैसे किंवा मिठाईचे आमिष तो दाखवत असे. त्यानंतर त्यांना उचलून तो लैंगिक अत्याचार करत असल्याचे पोलिसांनी सांगितले. दिल्लीत राहणाऱया चार, गुरुग्रामच्या तीन, तर झांसी आणि ग्वाल्हेरच्या प्रत्येकी एका चिमुरडीच्या बलात्कार आणि हत्या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.