|Monday, September 23, 2019
You are here: Home » उद्योग » व्होडाफोन-आयडीयाकडून हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संकल्प

व्होडाफोन-आयडीयाकडून हजारो कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा संकल्प 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

देशातील सर्वात मोठी दूरसंचार कंपनी व्होडाफोन आयडीया ही येत्या काळात लाखो हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याचा कंपनीचा मानस आहे. ही योजना व्होडाफोन आयडीया 2019-20 या वर्षामध्ये 27 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची योजना  आखत असल्याची माहिती कंपनीने यावेळी दिली.

कंपनीकडून लांब पल्याची योजना करुन आर्थिक वर्ष 2019-20 मध्ये 270 अब्ज रुपये(27 हजार कोटी रुपये) गुंतवले जाणार असून यात नोंदणीकृत योजना तयार केली जाणार आहे. तर ही योजना अंदाजे पुढील दोन वर्षाच्या कालावधी पर्यंत चालू ठेवण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. तर त्यावेळी बाजारपेठेतील स्थितीचा विचार करता योजनेत गुंतवणूक करण्यात येणारी रक्कम नक्कीच वाढणार आहे ती अंदाजे 8 हजार 400 कोटी रुपये इतकी  वाढ होऊ शकते.

व्होडाफोन आणि आयडीया यांच्या उपकरणात अगोदर कार्यरत असलेल्या योजनांमुळे जवळपास 6 हजार 200 कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे नोंदवण्यात आले. इंडस टॉवरमधील 11.15 टक्क्यांची हिस्सेदारी विकण्याची योजना राबण्यात येणार असून यातून 5 हजार कोटी रुपये कंपनीला मिळणार असल्याचा अंदाज कंपनीने व्यक्त केला आहे.