|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » परवानाधारकच गोव्यात मासळी आणू शकतात

परवानाधारकच गोव्यात मासळी आणू शकतात 

प्रतिनिधी /पणजी :

मासळीची वाहतूक करण्याचा परवाना ज्यांनी घेतला आहे, तेच व्यापारी परवानाधारक वाहनातूनच गोव्यात मासळी आणू शकतात, असे स्पष्टीकरण गोवा सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर केले आहे. मासळी आयातीवर बंद घातलेली नाही, तर फॉर्मेलिनयुक्त मासळी गोव्यात येऊ नये म्हणून निर्बंध घातले असल्याचे खंडपीठाला कळवले आहे.

दी सी फूड एकस्पोटर्स असोसिएशन ऑफ इंडिया (गोवा विभाग) च्या वतीने एम. व्ही. स्वामी व इतर 10 जणांनी सादर केलेली याचिका गुरुवारी सुनावणीस आली असता सरकारच्या वतीने प्रतिज्ञापत्र सादर करण्यात आले.

मासळीची वाहतूक करण्यासाठीही एफ. डी. ए.चा परवाना लागतो. परवाना प्राप्त वाहनातूनच सदर मासळीची वाहतूक करता येते. बर्फाच्या पेटय़ांमधून मासळी भरून साध्या वाहनातून मासळीची आंतरराज्य वाहतूक करता येत नाही. त्यासाठी खास पद्धतीचे वातानुकुलीत वाहन लागते. परवाना नसलेल्या वाहनातून मासळीची वाहतूक करता येत नाही, असे सरकारने स्पष्ट केले आहे.

Related posts: