|Thursday, November 21, 2019
You are here: Home » Top News » जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमची अंतिम सामन्यात धडक

जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत मेरी कोमची अंतिम सामन्यात धडक 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

भारताची बॉक्सर मेरी कोमने नवी दिल्लीतल्या जागतिक बॉक्सिंग स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. तिनं 48 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत उत्तर कोरियाच्या किम ह्यान्ग मिचा 5-0 असा धुव्वा उडवला. या विजयासह तिने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे.

 

मेरी कोमला या निर्विवाद विजयाने जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत सहावे सुवर्णपदक जिंकण्याची संधी दिली आहे. तिने आजवरच्या कारकीर्दीत जागतिक बॉक्सिंग स्पर्धेत पाच सुवर्ण आणि एका रौप्यपदकाची कमाई केली आहे. तसेच या विजयासह तिने या स्पर्धेत सातव्या पदकावर आपली दावेदारी निश्चित केली आहे. जागतिक स्पर्धेत सात वेळेस अंतिम सामन्यात पोहोचणारी आणि सर्वाधिक पदक जिंकणारी मेरी कोम पहिली महिला बॉक्सर बनली आहे.

 

आता अंतिम फेरीत मेरी कोमचा मुकाबला युपेनच्या हॅना ओखोटाशी होईल. मी यापूर्वी किम ह्यान्ग मिला आशियाई स्पर्धेत पराभूत केले होते. म्हणून मी सामन्यासाठी तयार होते. विजय असो किंवा पराजय, प्रत्येक खेळाडू यातून काही ना काही शिकत असतो. हॅनाच्या खेळावर अभ्यास करुन, अंतिम सामन्यात तिच्यावर मात करण्याचा प्रयत्न मी करणार आहे. अशी प्रतिक्रिया सामन्यानतंर मेरी कोमने व्यक्त केली.

 

Related posts: