|Saturday, February 22, 2020
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » दादर रेल्वेस्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करा …

दादर रेल्वेस्थानकाचे नामांतर चैत्यभूमी करा … 

दलित महासंघाची सीपीआर चौकात निदर्शने

प्रतिनिधी/ कोल्हापूर

  दादर (मुंबई) येथील रेल्वेस्थानकाचे नामांतर ‘चैत्यभूमी’ करावे, या मागणीसाठी  भारतीय दलित महासंघातर्फे सीपीआर चौकात बुधवारी (दि.21) दुपारी 1 वाजता निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन लक्ष्मीपुरी पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक वसंत बाबर यांना देण्यात आले.

 निवेदनात म्हटले अहे की, विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाणानंतर त्यांचा अंत्यविधी दादर येथे पार पडला. याच ठिकाणी त्यांच्या स्मरणार्थ स्तूप उभारून त्याचे नामकरण चैत्यभूमी असे करण्यात आले. डॉ. आंबेडकरांच्या कार्याची दखल घेऊन, दादर रेल्वेस्थानकाला ‘चैत्यभूमी’ असे नाव द्यावे,मागणीचा शासनाने गांभीर्याने विचार करावा. अन्यथा, राज्यात तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला आहे. 

 निवेदनावर भारतीय दलित महासंघाचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांत कांबळे, जिल्हा शहराध्यक्ष चंद्रकांत काळे, पन्नालाल इंगळे, प्रकाश साळोखे, अमोल कांबळे, कुमार सावंत, सतिश कासे, अभिजीत बनसोडे, रूपेश पाटील, सुनिल कांबळे यांच्या सह्य़ा आहेत.

Related posts: