|Monday, March 30, 2020
You are here: Home » Top News » सुपरमॉमला जगतज्जेतेपद

सुपरमॉमला जगतज्जेतेपद 

ऑनलाईन टीम / नवी  दिल्ली :

नवी दिल्लीत सुरु असलेल्या जागतिक बॉक्सिंग अजिंक्मयपद स्पर्धेत भारताच्या मेरी कोमने ऐतिहासीक कामगिरीची बजावली आहे. 48 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत खेळत असताना मेरी कोमने युपेनच्या एच.ओखोटोचा पराभव करत सहाव्या विजेतेपदावर आपले नाव कोरले. या कामगिरीसह मेरी कोमने आयर्लंडच्या केटी टेलरचा 5 विजेतेपदांचा विक्रम मोडीत काढला आहे.

 

पहिल्या सत्रात मेरी कोमने संपूर्णपणे वर्चस्व गाजवत ओखोटोला पुनरागमन करण्याची संधीच दिली नाही. दुसऱया फेरीत ओखोटोने मेरी कोमला चांगली झुंज देण्याचा प्रयत्न केला. दुसऱया फेरीदरम्यान ओखोटोने मेरीला खालीही पाडलं, मात्र यामधून सावरत मेरीने पुन्हा एकदा दमदार पुनरागमन केले. तिसऱया सत्रामध्ये ओखोटोने आपल्या लौकिकाला साजेसा खेळ करत मेरी कोमला चांगलचं जेरीस आणलं. मात्र मेरीने सामन्यावरचे आपले नियंत्रण कायम ठेवले. अखेरीस पंचांनी एकमताने मेरीला सामन्यात विजेता घोषित केले.

 

Related posts: