|Monday, September 23, 2019
You are here: Home » क्रिडा » ‘मॅग्निफिसंट मेरी’ कोमचे ऐतिहासिक सुवर्ण

‘मॅग्निफिसंट मेरी’ कोमचे ऐतिहासिक सुवर्ण 

विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियन होणारी एकमेव महिला बॉक्सर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

‘मॅग्निफिसंट मेरी’ची बिरुदावली पुन्हा एकदा सार्थ ठरविताना भारताची स्टार महिला बॉक्सर एमसी मेरी कोमने विक्रमी सहाव्यांदा वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकून नवा इतिहास घडविला. अंतिम फेरीत तिने युपेनच्या हॅन्ना ओखोटाचा 5-0 असा एकतर्फी पराभव करून सुवर्णपदक पटकावले. सहा सुवर्ण जिंकणारी ती एकमेव महिला बॉक्सर बनली आहे. सोनिया चहलला मात्र अंतिम फेरीत पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदकावर समाधान मानावे लागले.

तीन मुलांची माता असलेल्या 35 वषीय ‘मदर मेरी’ने 48 किलो वजन गटाच्या अंतिम लढतीत ओखोटावर विजय मिळविताना फारसे परिश्रम घ्यावे लागले नाहीत आणि पाचही पंचांनी तिच्या बाजूने कौल दिला. ऑलिम्पिक कांस्य मिळविलेल्या मेरी कोमने याआधी या स्पर्धेत पाच सुवर्णपदके जिंकली होती आणि सहावे सुवर्ण जिंकण्याच्या इराद्यानेच ती रिंगणात उतरली होती. ओखोटाकडून तिला कडवा प्रतिकार होईल अशी अपेक्षा केली जात होती. पण मेरी कोमने तिला सहज पराभूत करीत ऐतिहासिक कामगिरीवर शिक्कामोर्तब केला. तिने 2001 मध्ये पहिल्यांदाच या स्पर्धेत रौप्य जिंकले होते. त्यानंतर तिने पाच वेळा सुवर्णपदकाचीच कमाई करीत अभूतपूर्व कामगिरी बजावली होती. 2010 मध्ये ब्रिजटाऊन, बार्बाडोस येथे झालेल्या स्पर्धेत तिने याआधीचे शेवटचे सुवर्ण जिंकले होते.

आयर्लंडच्या केटी टेलरने या स्पर्धेत सर्वाधिक सहा पदके (5 सुवर्ण, 1 कांस्य) जिंकून सर्वात यशस्वी महिला बॉक्सर होण्याचा मान मिळविला होता. मेरी कोमने 6 सुवर्ण, 1 रौप्य जिंकून तिला आता मागे टाकत सर्वात यशस्वी महिला बॉक्सर होण्याचा मान मिळविला आहे. याशिवाय क्मयुबाचा महान मुष्टियोद्धा फेलिक्स सेव्हॉनच्या विक्रमाशीही तिने बरोबरी केली आहे. वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या इतिहासात ते आता सर्वात यशस्वी महिला व पुरुष बॉक्सर म्हणून ओळखले जातील. तीन ऑलिम्पिक सुवर्णपदके जिंकणाऱया सेव्हॉनने 1986 तं 1989 या कालावधीतील वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये हेविवेट गटात 6 सुवर्ण व 1 रौप्य पटकावले होते. मेरी कोमने 2001 रौप्य जिंकल्यानंतर 2002, 2005, 2006, 2008, 2010 असे सलग पाचवेळा सुवर्णपदके पटकावली.

विक्रमी यश देशाला समर्पित

सुवर्णपदक निश्चित झाल्यानंतर ऊर भरून आलेल्या मेरी कोमला अश्रू अनावर झाले. रिंगणाबाहेर आल्यानंतर तिने राष्ट्रध्वज घेत सर्वांना अभिवादन करून आभार मानले. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सहा सुवर्णपदके जिंकणारी एकमेव महिला बनल्यानंतर मेरी कोमने हे यश देशाला समर्पित केल्याचे सांगितले. ‘मी थोडीशी भावूक झाले आहे. ऑलिम्पिक स्पर्धेत 48 किलो वजन गट हा प्रकारच घेतला जात नाही. पण तुमचे प्रेम आणि पाठिंब्याच्या बळावरच मी टोकियो ऑलिम्पिकसाठी निश्चितच पात्रता मिळवेन, अशी मला खात्री वाटते. चार वर्षांपूर्वी मी रिओ ऑलिम्पिकसाठी पात्र ठरू शकले नव्हते आणि त्याची खंत मला आजही वाटते,’ अशा भावना तिने व्यक्त केल्या. तुमचे प्रेम व पाठिंबा हे मला बळ देणारे ठरले आणि देशाला मी सुवर्णपदकाशिवाय आणखी काय देऊ शकणार? म्हणून माझे हे यश देशाला समर्पित करीत आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये मला 51 किलो गटात खेळावे लागणार असल्याने तेथे सुवर्ण मिळविणे कठीण जाणार, याची मला जाणीव आहे. कारण प्रतिस्पर्धी उंच असले की त्यांचा आवाका वाढतो आणि याचा त्यांना लाभ होतो. तरीही मी टोकियोमध्ये सुवर्ण जिंकण्याचे स्वप्न पाहणे सोडणार नाही,’ असा विश्वासही तिने व्यक्त केला.

57 किलो गटाच्या अंतिम लढतीत भारताच्या सोनिया चहलकडून अपेक्षा केली जात होती. पण जर्मनीच्या वाहनर ओमेला गॅब्रिएलीकडून तिला 1-4 असा पराभव स्वीकारावा लागल्याने रौप्यपदक मिळाले. 21 वषीय सोनियाने 2016 मध्ये वरि÷ स्तरावर खेळण्यास सुरुवात केली असून तिची ही पहिलीच वर्ल्ड चॅम्पियनशिप स्पर्धा होती. तरीही पदार्पणातच तिने रौप्यपदक पटकावण्याचा प्रशंसनीय पराक्रम केला आहे. भारताला या स्पर्धेत एकूण चार पदके मिळाली असून त्यात 1 सुवर्ण, 1 रौप्य, 2 कांस्यपदकांचा समावेश आहे.

पंतप्रधांनाकडून अभिनंदन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही मेरी कोमने विक्रमी सहावे सुवर्ण जिंकल्याबद्दल तिचे खास कौतुक केले आहे. ‘भारतीय क्रीडा क्षेत्राला अभिमानास्पद वाटायला लावणारे यश मेरी कोमने मिळविले असून शिस्तबद्धता आणि नि÷sच्या बळावर तिने जागतिक स्तरावर मिळविलेले हे यश सर्वांनाच प्रेरणादायक ठरणारे आहे. तिने मिळविलेले यश खरोखरच ‘स्पेशल’ आहे,’ असे पंतप्रधानांनी आपल्या ट्विटरवरील संदेशात म्हटले आहे.