|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सुपे-कुदेमनी नजीक बिबटय़ाचे दर्शन

सुपे-कुदेमनी नजीक बिबटय़ाचे दर्शन 

नागरिकांत घबराट बिबटय़ाला पकडण्यासाठी वनविभागाने लावलेत सापळे

वार्ताहर/ कारवे

बेळगाव वेंगुर्ला राज्यमार्गावरील कुदेमनी-सुपे दरम्यान असलेल्या काजू आंबा बागेत बिबटय़ाचे दर्शन झाल्याने येथील नागरिकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.

याबाबत असे समजते की, शनिवारी सकाळपासूनच सदर बिबटय़ा या परिसरात काजू बागेमध्ये बसलेला होता कालच या बिबटय़ाचे माडवळे परिसरातील जंगलाच्या बाजूस दर्शन झाले होते. येथील चर्चा ताजी असतानाच आज चंदगड तालुक्मयातील प्रमुख राज्य मार्ग असलेल्या बेळगाव-वेंगुर्ला मार्गावरील कुदेमनी नजीकच्या बागेत बिबटय़ा दिसला. बिबटय़ाचे दर्शन होताच या प्रमुख मार्गावरून जाणाऱया वाहनधारकांनी रस्त्याच्या बाजूला गाडय़ा थांबविल्या व बिबटय़ा पाहण्यासाठी गर्दी झाली. उपस्थित नागरिकांनी या बिबटय़ाचे फोटो घेण्यासाठी प्रयत्न केला. बिबटय़ा किरकोळ स्वरूपात जखमी अवस्थेत असल्याची शंका असून बिबटय़ा एक पाय ओढत चालत होता. तो भुकेलेलेल्या अवस्थेत असल्याची शंका होती. कुदेमनी व सुपे परिसरातील नागरिकांनी बेळगाव व चंदगड वनविभागाच्या अधिकाऱयांना संपर्क साधला वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यानंतर हा बिबटय़ा पुन्हा ढेकोळी परिसराकडे माघारी फिरला. सध्या या परिसरामध्ये सुगीच्या कामांची धांदल आहे. साखर कारखाने सुरू झाल्याने ऊस तोडीची लगबग सुरू आहे त्यामुळे या परिसरातील शेतकरी नियमितपणे शेतामध्ये काम करताना दिसत आहेत. गेल्या आठ-दहा दिवसांपासून या बिबटय़ाचे वास्तव्य या भागात आहे. त्यामुळे शेतकऱयांना शेताकडे जाणे मुश्कील बनले आहे. अजुनी शेतात ऊस उभा असल्याने बिबटय़ा कुठल्या दिशेहून कुठे जाईल याचा थांगपत्ता लागणे मुश्कील आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग मुठीत जीव घेऊन या परिसरात वावरताना दिसत आहे.

वनविभागाने लावलेत सापळे

कुदेमनी सुपे परिसर हा महाराष्ट्र कर्नाटक सीमेवर आहे. कुदेमनी गाव तर कर्नाटकातच आहे. त्यामुळे हा बिबटय़ा दिसल्यानंतर कुदेमनीच्या परिसरातील लोकांनी बेळगाव वनविभागास तर सुपे परिसरातील लोकांनी चंदगड वनविभागास संपर्क साधला. दोन्हीही वनखात्याच्या अधिकाऱयांनी हा बिबटय़ा पकडण्यासाठी दोन सापळे लावले आहेत. चंदगड वनखात्याने जवळ गेल्या पाच-सहा दिवसांपासून सापळा लावून ठेवला आहे तर बेळगाव वनविभागाने तर परिसरात एक सापळा लावून ठेवला आहे.

 

बिबटय़ाला पाहण्यासाठी बघ्यांची तुफान गर्दी

बेळगाव वेंगुर्ला मार्गावरच हा बिबट्या दिसल्याने येथून ये-जा करणाऱया वाहनधारकांनी येथे प्रचंड गर्दी केली होती. उत्साही नागरिक सदर बिबटय़ाची छबी आपल्या मोबाईलमध्ये टिपण्यासाठी जीव धोक्मयात घालून त्याचा पाठलाग   करताना दिसत होते. बेळगाव वेंगुर्ला मार्गावर वाहनांची प्रचंड गर्दी झाली होती आणि या सर्वच कारणामुळे बिबट्या रस्ता ओलांडून वैजनाथ महीपाळगडच्या डोंगरात गेला नाही. तो परत माघारी फिरला व ढेकोळी परिसराकडे गेला. वन खात्याच्या कर्मचाऱयांनी ढेकोळी च्या आसपास पर्यंत या बिबटय़ाचा पाठलाग केला. मात्र बिबटय़ाला पकडण्यात दोन्ही विभागाच्या वनखात्याना अपयश आले.