|Sunday, December 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सार्क परिषद युवा संमेलन श्रीलंका येथे

सार्क परिषद युवा संमेलन श्रीलंका येथे 

मोर्ले-सत्तरीची प्रिया दळवी करणार भारताचे नेतृत्त्व

28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान संमेलन

उदय सावंत / वाळपई

28 नोव्हेंबरपासून श्रीलंका या ठिकाणी आयोजित होत असलेल्या सार्क परिषदेच्या युवा संमेलनासाठी भारतातर्फे सादरीकरण करण्यासाठी गोव्यातील प्रिया दळवी यांची निवड झाली आहे. प्रिया दळवी ही सत्तरी तालुक्मयातील मोर्ले या ठिकाणी राहणारी असून अशा परिषदेसाठी  निवड झालेली सत्तरी तालुक्मयातील ही पहिलीच तरुणी ठरली असून यामुळे भागात अभिनंदन करण्यात येत आहे. 28 रोजी या संमेलनात भाग घेण्यासाठी पुणे महाराष्ट्र येथून श्रीलंकेला रवाना होणार आहे.

80 देशातील 450 युवा-युवतींचा सहभाग

श्रीलंकेच्या बंदरनाईके मेमोरियल इंटरनॅशनल कॉन्फरन्स सेंटर कोलंबो येथे 28 नोव्हेंबर ते 1 डिसेंबर दरम्यान सार्क परिषदेच्या संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनात सार्क परिषदेदरम्यान येणाऱया देशांमध्ये आर्थिक सुबत्ता व तरुणांचा विकास या संदर्भाचा प्रामुख्याने विचार करण्यात येणार आहे. 80 देशातील एकूण साडेचारशे तरुण-तरुणी यामध्ये भाग घेणार असून यात सुमारे 80 देशांतील सादरीकरण होणार आहे. यासाठी प्रिया दळवीची निवड झाली असून यासंदर्भात पत्र तिला चार दिवसांपूर्वी आले आहे. प्रिया दळवी ही मूळ मोर्ले-सत्तरी येथील असून 2012 साली गोवा इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये अभियांत्रिकी पदवी शिक्षण पूर्ण करून ती सध्या पुणे महाराष्ट्र येथील एका नामांकित कंपनीत आयटी इंजिनीअर म्हणून काम करीत आहे. तिने लिहिलेल्या व्हॉट अ पॅशियन या पुस्तकाला चांगला प्रतिसाद मिळाला असून अभियांत्रिकीचे शिक्षण न घेता बारा इंजिनियर्सने केलेल्या वेगवेगळय़ा कौशल्यावर प्रकाशझोत टाकण्यात आलेला आहे. यामुळे या पुस्तकाला जगभरात चांगल्या प्रकारचा प्रतिसाद मिळाला आहे. यासंदर्भात

संधीचे आपण सोने करू : प्रिया दळवी

प्रिया दळवी हिच्याशी संपर्क साधला असता तिने सांगितले की, श्रीलंकेमध्ये होणाऱया सार्क परिषदेच्या युवा संमेलनासाठी आपण आपले शिक्षक रवी वर्मा यांच्या विनंतीवरून शेवटच्या टप्प्यात नामांकन सादर केले होते. यावेळी आपण लिहिलेल्या पुस्तकाचा नामांकन दाखल करून घेण्यासाठी महत्त्वाची मदत झाल्याचे तिने स्पष्ट केले. शेवटच्या टप्प्यात आपण नामांकन दाखल केल्यानंतर आपल्याला यामध्ये भाग मिळणार की नाही याबाबत सांशकता होती मात्र सार्क परिषदेच्या इंटरनॅशनल समितीने आपली यासाठी निवड केल्याबद्दल आपणास आनंद होत असल्याचे ती म्हणाली. एकूण दहा मिनिटांसाठी सदरचे सादरीकरण होणार असून यामध्ये आपण भारतामध्ये आर्थिक सुबत्ता व तरुणांसाठी भविष्य या विषयावर सादरीकरण करणार असल्याचे तिने सांगितले. सध्या आपण उत्कृष्ट संभाषण तीन महिन्यांचा कोर्स पुणे याठिकाणी करत असून  सादरीकरण करण्यासाठी चांगल्या प्रकारचा फायदा होणार असल्याचे तिने स्पष्ट केले. सार्क परिषदेदरम्यान येणाऱया भारत बांगलादेश भूतान मालदीव नेपाळ अफगाणिस्तान श्रीलंका पाकिस्तान या देशातील सभासदांचा या परिषदेत सहभाग असून आपणास मिळालेल्या संधीचा आपण निश्चितच सोने करू, अशा प्रकारची आशा व्यक्त केली आहे.

आर्थिक पाठबळासाठी याचना

भारतातर्फे सादरीकरण करण्यासाठी तरुणीची पहिल्यांदाच निवड झाली असून दुसऱया अर्थाने प्रिया दळवी सत्तरी तालुक्मयातील मोर्ले या ठिकाणी असल्याने नागरिकांकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. आर्थिक परिस्थिती सदृढ असली तरी श्रीलंकेमध्ये सादरीकरण करण्यासाठी आवश्यक भासणारा आर्थिक खर्च यासाठी तिने गोवा सरकारच्या क्रीडा व युवा खात्याकडे आर्थिक मदतीसाठी विनंती केली होती मात्र तिला योग्य प्रमाणात प्रतिसाद न मिळाल्याचे समजते. सध्या तिला आर्थिकसंदर्भात अडचणी निर्माण होत असून त्यासाठी सत्तरी अर्बन को-ऑपरेटिव्ह सोसायटी यांच्या व्यवस्थापनाकडे आर्थिक पाठबळाची मागणी केली आहे.

Related posts: