|Thursday, January 23, 2020
You are here: Home » राष्ट्रीय » ऍट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात बेडय़ा घालून प्रचार

ऍट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात बेडय़ा घालून प्रचार 

मध्यप्रदेशात आरक्षण आणि ऍट्रॉसिटी कायद्याच्या विरोधात स्थापन झालेल्या सपाक्स पक्षाचे उमेदवार अनोख्या प्रकारे प्रचार करत आहेत. सपाक्सचे खातेगांव येथील उमेदवार डालचंद जाटने हातात बेडय़ा घालून प्रचार केला आहे. त्यांनी आयोजित केलेल्या रोड शोत सपाक्स पक्षाच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा डॉ. वीणा घाणेकर आणि युवा शाखेचे महासचिव प्रसंग परिहार यांनी भाग घेतला. रोडशोत सामील लोकांनी हातात बेडय़ा घालूनच प्रचार केला आहे. ऍट्रॉसिटी कायद्यात जामिनाची कोणतीही तरतूद नाही. 6 महिन्यांपर्यंत सामान्य, मागास आणि अल्पसंख्याक समुदायाच्या लोकांना तुरुंगात खितपत पडावे लागते. त्यानंतरच न्यायालयात आरोपपत्र दाखल केले जाईल. या काळय़ा कायद्याबद्दल जनतेत जागरुकता निर्माण करणे हाच सपाक्स पक्षाचा मोठा उद्देश असल्याचा दावा जाट यांनी केला आहे. पैसे आणि बाहुबळाच्या मदतीने भाजप अन्य पक्षांच्या उमेदवारांना धमकावित असल्याचा आरोप सपाक्स पक्षाचे अध्यक्ष हीरालाल त्रिवेदी यांनी केला आहे.

 

Related posts: