|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » स्व संजयदादा पाटील कुस्ती संकुलाला सर्वोतोपरी मदत करणार.

स्व संजयदादा पाटील कुस्ती संकुलाला सर्वोतोपरी मदत करणार. 

वार्ताहर / औंध :

कुस्ती संकुलाच्या माध्यमातून तरुण पिढी सशक्त आणि बलदंड घडवण्याचे देशहिताचे काम हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी हाती घेतले आहे. पैलवानांनी देश विदेशात आपल्या कर्तृत्वाने या तालमीचे नाव करावे. स्व संजयदादा पाटील कुस्ती संकुलातील मल्लांच्या मदतीसाठी मी सदैव संतोष आबा वेताळ यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहिन, अशी ग्वाही खासदार उदयनराजे भोसले यांनी दिली.

   खासदार उदयनराजे यांनी सैदापूर तेथील हिंदकेसरी संतोष आबा वेताळ यांनी स्थापन केलेल्या स्व संजयदादा पाटील कुस्ती संकुलाला भेट दिली. यावेळी उपस्थित मल्ल आणि कुस्ती शौकीन यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी हिंदकेसरी संतोष वेताळ, हणमंत पवार,  विजयराज यादव, माजी सभापती सुनील काटकर, सचिन पाटील, सुनील जाधव, धनाजी शिंदे (तात्या), यांची प्रमुख उपस्थिती होती.

    खासदार उदयनराजे पुढे म्हणाले, कुस्ती अस्सल ग्रामीण भागातील रांगडा मर्दानी खेळ आहे. कुस्तीला मोठी परंपरा आहे. ती जपण्याचे काम वेताळ करीत आहेत ही बाब कौतुकास्पद आहे. तालमीत मल्लांना चांगल्या सोयीसुविधा उपलब्ध मिळण्यासाठी खासदार फंडातून आणखी निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

     यावेळी त्यांनी कुस्ती संकुलाची पाहणी करून सोई सुविधा बाबत पैलवानांशी संवाद साधला. व समाधान व्यक्त केले. हिंदकेसरी संतोष वेताळ यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले. धनाजी शिंदे यांनी आभार मानले.