|Thursday, December 12, 2019
You are here: Home » भविष्य » राशिभविष्य

राशिभविष्य 

मंदिर बांधणी व देव्हाऱयावरील कळस

बुध. दि. 28 नोव्हें. ते 4 डिसेंबर 2018

वास्तुशास्त्रानुसार घरातील देव्हाऱयाला कळस असू नये असे म्हणतात, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया काय असे काही जणांनी विचारलेले आहे. देव्हारा का असावा? त्याचे महत्त्व, त्याचे विधी विधान पूजन, कळसाचे महत्त्व, मंदिर बांधणीचे नियम असे अनेक प्रश्न उपस्थित केले जातात. 2015 मध्ये कळसावर आधारित तीन लेख दिलेले आहेत ते अंक मिळाल्यास जरुर वाचावेत. तरीही काहीजणांना त्याचे महत्त्व कळावे म्हणून त्या लेखातील काही भाग यावेळी पुन्हा दिलेला आहे. आजकाल कोठेही जा अळंबीप्रमाणे मंदिरे उभारलेली दिसतात. एखाद्या देवाला अथवा देवस्थानला महत्त्व मिळते असे समजल्यावर गल्लोगल्ली अशी मंदिरे उभारलेली दिसून येतात. त्यात भक्ती वगैरेचा लवलेशही नसतो. मंदिराच्या माध्यमातून पैसा कसा कमवता येईल हा एकमेव उद्देश असल्याचे अनेक ठिकाण स्पष्ट दिसून  येते. मंदिर बांधण्याचा अधिकार अथवा दृष्टांत झाल्याशिवाय मंदिर बांधण्याचे ठरविल्यास जिवावरचे संकटे येतात हे अनेकांना माहीत नसेल. मंदिर बांधण्याची जागा पवित्र आहे की नाही, मंदिर बांधणारी व्यक्ती त्या लायकीची आहे की नाही, सामाजिक कल्याणाचा हेतू आहे का? इतर काही मनात दडलेले आहे? मंदिर बांधल्यानंतर त्याची सोय कोण पाहणार? जी मूर्ती बसविणार ती शास्त्रानुसार योग्य व प्रमाणबद्ध आहे की नाही, या बाबी पहाव्या लागतात.  काही मंदिरे गटारी अथवा नाल्यावर उभारलेली आढळतात. खालून घाण पाणी वहात असते. मग या मंदिरांचे पावित्र्य काय राहणार? काही ठिकाणी कोणतेही पौराणिक अथवा वैदीक महत्त्व नसलेल्या ठिकाणी मंदिरे बांधून तेथे सर्व तऱहेच्या शांती करण्यात येतात. अशाने गुण येण्यापेक्षा त्रास होण्याची शक्मयताच अधिक असते. वास्तविक असे विधी हे तीर्थक्षेत्रीच करावे लागतात. नाशिक जिल्हय़ातील सप्तश्रृंग गडावरील  सप्तश्रृंगी देवीचे जागृत मंदिर. दुपारी चारची वेळ एका तरुण भटजींना पूजाअर्चा अभिषेक करणार का? असे विचारल्यावर… अहो ही वेळ अभिषेक व पूजेची आहे का? असा त्यानी प्रश्न विचारला. आम्ही 700 किलोमीटर दुरून आलेलो आहोत वाटल्यास दुप्पट चौपट दक्षिणा देऊ असे  सांगितल्यावर ते भटजी उसळले व म्हणाले अहो तुम्ही कोण आम्हाला देणार, देणारी ती जगन्माता महालक्ष्मी जगदंबा बसलेली आहे. तिला यावेळी आम्ही त्रास देणार नाही. वाटल्यास मुक्काम करा व सकाळी या. तुम्ही सांगाल तशी पूजा करू. महालक्ष्मीचे हे जागृत स्थान असल्याने या ठिकाणी कोणतीही नाटके व फसवणूक वगैरे चालत नाही व जर कुणी तसे करण्याचा प्रयत्न केलाच तर त्याला त्याचे प्रायश्चित भोगावे लागेल, असे त्यांनी सांगितले. त्यांचा स्पष्टवक्तेपणा पाहून आम्ही या भटजींना मनोमन कोटी कोटी नमस्कार केले. अशा व्यक्ती फार कमी असतात. अशा चांगल्या व स्वच्छ वर्तनाच्या गुरुजींच्यामुळे देवस्थानांचे महत्त्व आजही अबाधित आहे अशा भटजींचा इतरांनीही आदर्श घेण्यास हरकत नाही. ज्या मंदिराला कळस असतो ती जागृत  असतात. कारण तेथे रोजच्या रोज शास्त्राsक्त पूजा चालू असतात. कळस ठेवणार असाल तर घरात रोजची पूजाअर्चा व्यवस्थित व्हायला हवी. केव्हातरी पूजा करीत असाल तर कळस न ठेवणेच चांगले.

मेष

या सप्ताहात अचानक आर्थिक लाभ होत राहील. विवाहासंबंधी बोलणी, चर्चा सुरू होतील. संततीच्या बाबतीत शुभवार्ता कळेल. नोकरी व्यवसायात अचानक बदली बढतीचे योग येतील. व्यापारात अचानक वृद्धी होईल. विद्यार्थ्यांनी अभ्यासाकडे विशेष लक्ष द्यावे. नोकरीमध्ये अधिकारी असो अथवा प्यून असो शक्मयतो वादविवादाचे प्रसंग कटाक्षाने टाळा. बदलत्या हवामानामुळे बारीक सारीक आजारांची कुरबुर सुरू होईल.


वृषभ

 अति ताणतणावामुळे आरोग्याकडे दुर्लक्ष झाल्यामुळे गुडघ्याचे आजार सुरू होतील. त्यासाठी आजाराकडे दुर्लक्ष करू नका. पूर्वी काही घेतलेल्या कर्जासंबंधी लोक तगादा लावतील. पण त्यातून काही मार्ग निघेल. कुटुंबामध्ये शुभवार्ता ऐकू येतील. नोकरी व्यवसायात असमाधानकारक वातावरण राहील. व्यापारी व्यवसायिक लोकांनी जो काही या सप्ताहात स्वत:ला नफा झालेला असेल त्याचा योग्य तऱहेने वापर करावा. विद्यार्थी वर्गाना या सप्ताहात आनंदी राहून अभ्यास करावा यश मिळेल.


मिथुन

आर्थिक दृष्टय़ा या सप्ताहात चढउतार जाणवेल. रागावर व खाण्यापिण्यावर स्वत: बंधन घाला. घरातील वातावरण हसत खेळत ठेवा, त्यामुळे घरात सुख शांती निर्माण होईल. कुटुंबातील एखाद्या थोर व्यक्तिच्या आजाराची चिंता सतावेल. नोकरी व्यवसायात अधिकारी व्यक्तिशी व्यवहार करताना जपून करा. व्यापारी वर्गाला मनासारखे व्यापारात यश मिळेल. अचानक कोठून तरी फायदा झाल्याचे जाणवेल. विद्यार्थ्यांनी मोठय़ा उत्साहाने व जोमाने अभ्यास करावा.


कर्क

हा आठवडा संमिश्र  फळ देणारा ठरेल. यापुढे आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या कमी होऊ लागतील. खर्चावर थोड नियंत्रण असू दे. पति पत्नीत वाद विवाद वाढणार नाही याची काळजी  घ्या. काही अर्धवट राहिलेली सरकारी  कामे पूर्ण करून घ्या. नोकरी व्यवसायात उत्साहवर्धक दिवस जाणवतील. पण काही महत्त्वाची ऑफिसची कामे ताबडतोब करून घ्या. त्यामुळे तुमच्यावर अधिकार वर्ग खुष राहील. व्यापारी वर्गाच्या लोकांना काही आपली अडकलेली रक्कम परत मिळण्याची संधी निर्माण करी. विद्यार्थ्यांनी आळसपणा सोडून अभ्यासावर लक्ष केंद्रीत करावे.


सिंह

व्यापारी वर्गाला हा आठवडा खर्चात वाढ करील. आरोग्याच्या काही तक्रारी असतील तर त्या कमी होऊ लागतील. काही कारणास्तव कर्ज काढावे लागत असेल तर जपूनच काढावे. कुटुंबातील काही व्यक्तिनी प्रेमाने व समंजसपणाने  वागावे. नोकरी व्यवसायातील लोकांच्यावर  अधिकारी वर्ग खुश राहतील. त्यामुळे पगारवाढ, प्रमोशन व बदली बढतीचे योग येतील. विद्यार्थी वर्गाना हा सप्ताह उत्साही व आनंदी राहील. व्यवसायात अचानक बदल करावासा वाटेल.


कन्या

शत्रूच्या कारवाया हळुहळू कमी होऊ लागतील. वाहन वगैरे चालविताना काळजी घ्यावी. या सप्ताहात अचानक आर्थिक फायदा होईल. पण तितकाच आर्थिक खर्च उद्भवेल. शक्मयतो कर्जाच्या भानगडीत पडू नका. किंमती वस्तू खरेदी करण्याचा योग येईल. पैपाहुण्याची वर्दळ वाढेल. नवीन कलाकुसर शिकण्यास उत्तम.


तुळ

कोर्टकचेरीच्या कामात गुंतला असाल तर काळजी घ्यावी लागेल. काही जुनी प्रकरणे मात्र निकालात निघतील. काही जणांच्या हस्तक्षेपामुळे प्रत्येक गोष्टीत संघर्षानेच यश मिळवावे लागेल. कुणाच्या जामिनकी अथवा मध्यस्थी प्रकरणात पडू नका. शेजारी व नातेवाईक यांच्याशी असलेले संबंध बिघडविण्याची शक्मयता आर्थिक स्थिती मात्र चांगली राहील.


वृश्चिक

गुरु शुभ असल्याने आर्थिक आवक चांगली राहील. थोरामोठय़ांशी ओळख होऊन त्यांच्याकडून मोठी कामे होतील. मित्र मंडळी व मुलेबाळे यांच्याशी मतभेद शक्मय, शांत राहणे, योग्य ठरेल. मुलांच्या हौशी तसेच ड्रायव्हर लोकांमुळे एखादे प्रकरण अंगलट येईल. व्यवसाय असेल तर हिशोब व्यवस्थित ठेवावेत.


धनु

अग्नि, पाणी, वीज व सरकारी अधिकारी यापासून सावध राहावे. आगीशी खेळ करणे टाळा. परस्पर नोकरी व्यवसायात महत्त्वाचे बदल होतील. काही आकस्मिक प्रकरणे घडून जागा सोडण्याचा विचार कराल. क्षुल्लक कारणावरून वादावादी होईल. पण त्याचे परिणाम मात्र दूरगामी असतील. त्यासाठी जपावे. अति दूरवरचे प्रवास टाळावेत.


मकर

अनोळखी व्यक्तीनी प्रसाद वगैरे सांगून काही खायला दिल्यास घेऊ नयेत. कोणतीही गुंतवणूक करताना सावध रहा. अचानक फायद्याच्या बाबींचा अंदाज न लागल्याने काही बाबी नुकसानकारक ठरू शकतील. त्यासाठी सावधगिरी बाळगावी. आरोग्याच्या तक्रारी सुरू होतील. हाती घेतलेले काम वेळेवर पूर्ण होईलच याची खात्री नाही.


कुंभ

ग्रहमान संमिश्र आहे. त्यामुळे स्वभावात वैचित्र्य येण्याची शक्यता आहे. अचानक मोठे लाभ संभवतात. मुलाबाळांना वाहन देताना काळजी घ्यावी. तसेच मित्रमंडळींच्या बाबतीत मोठे गैरसमजही निर्माण होतील. या सप्ताहात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेताना काळजीपूर्वक वागावे.


मीन

नोकरी, व्यवसाय व घरगुती बाबी यांची सरमिसळ करू नका. काही प्रकरणामुळे असलेली नोकरी बदलण्याचा प्रसंग येईल. वास्तू व आर्थिक बाबी या बाबतीत काही तरी महत्त्वाच्या घटना घडतील. भाजणे, कापणे, होरपळणे यापासून सांभाळावे. मोठी गुंतवणूक करताना काळजी घ्यावी लागेल.

 

Related posts: