|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » leadingnews » मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत ; भाजपा, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी

मराठा आरक्षणाचा ATR आज विधानसभेत ; भाजपा, शिवसेनेच्या आमदारांना व्हीप जारी 

ऑनलाईन टीम / मुंबई :

मराठा आरक्षणासंदर्भातील कृती अहवाल राज्य सरकार आज सभागृहात मांडणार आहे. सभागृहात दगाफटका टाळण्यासाठी भाजप आणि शिवसेनेने आपापल्या आमदारांना पुढील तीन दिवसांसाठी व्हीप जारी केला आहे. हिवाळी अधिवेशनाचे शेवटचे महत्त्वाचे तीन दिवस शिल्लक आहे. या तीन दिवसात मराठा आरक्षणाचा कृती अहवाल, विधेयक सादर करुन ते मंजूर करुन घेण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. त्यामुळे महत्त्वाचे कामकाज आणि विधेयक पाहता आमदांना सभागृहात हजर राहण्यासाठी व्हीप जारी करण्यात आला आहे.

आधी कृती अहवाल पटलावर मांडला जाईल त्यानंतर मराठा आरक्षणाचे विधेयक सादर होण्याची शक्मयता आहे. परंतु मराठा आरक्षणाबाबत आज सकाळी होणाऱया उपसमितीची बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. कालही मराठा आरक्षण उपसमितीची बैठक पार पडली. यात एटीआर आणि विधेयक मांडण्याबाबत चर्चा झाली. तसेच 16% आरक्षण देण्यावर एकमत झाल्याचे कळते.

तसेच ओबीसी समाजाच्या 52 टक्के आरक्षणाला बाधा न आणता सरकार मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार आहे. राज्यात सध्या 52 टक्के आरक्षण आहे, 50 टक्के नाही. एसईबीसीचे आरक्षण जिवंत आहे. त्यामुळे मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितले.

 

Related posts: