|Sunday, June 16, 2019
You are here: Home » leadingnews » जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केले ठार

जवानांनी पुलवामामध्ये 2 दहशतवाद्यांना केले ठार 

ऑनलाईन टीम / श्रीनगर :

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे जवानांनी दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. 28 नोव्हेंबर रोजी रात्री अवंतीपुरा परिसरात भारतीय लष्कराने दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली. या मोहिमेमध्ये जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातले आहे. शिवाय, दहशतवाद्यांकडील दारूगोळादेखील जप्त केला आहे. दरम्यान, ठार करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्यापपर्यंत ओळख स्पष्ट झालेली नाही.

दरम्यान, बुधवारी बडगाम जिह्यात झालेल्या चकमकीमध्ये जवानांनी लष्कर-ए-तोयबाचा कमांडर नवीद जटला कंठस्नान घातले. जम्मू काश्मीरमधील ‘रायझिंग काश्मीर’ वृत्तपत्राचे संपादक शुजात बुखारी यांच्या हत्येत नवीद जटचा सहभाग होता. पाकिस्तानच्या सीमारेषेवरील कुरापती दिवसेंदिवस वाढतच आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय भारतीय हद्दीत जास्तीत जास्त दहशतवाद्यांची घुसखोरी घडवण्याच्या प्रयत्नात आहे. शिवाय, यावषी भारतीय लष्कराच्या ऑपरेशन ऑलआऊटमध्ये 241 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याने पाकिस्तान बिथरला आहे. मागील वषी जवानांनी 213 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते.