|Thursday, September 19, 2019
You are here: Home » leadingnews » विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर

विधानसभेत मराठा आरक्षण विधेयक एकमताने मंजूर 

 

ऑनलाईन टीम / मुंबईः

बहुचर्चित मराठा आरक्षण विधेयक सभागृहात सादर करण्यात आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हे विधेयक विधानसभा पटलावर मांडलं. मराठा समाज आरक्षण विधेयक 2018 या विधेयकास विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी काँग्रेसकडून एकमताने मंजूरी दिली आहे. त्यानंतर, अजित पवार यांनीही या विधेयकास एकमताने मंजूरी देत पाठिंबा देत असल्याचं म्हटले आहे. मराठा आरक्षणाचा कृती अहवाल (एटीआर) आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत सादर करण्यात आला. या 15 पानी अहवालात मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण विधेयक 2018 सभागृहात मांडल्यानंतर भाजप नेत्यांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय अशा घोषणा घेतल्या. तर मुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांनी सभागृहातील एक आमदार असलेल्या पक्षापासून ते अपक्ष आमदारांपर्यंत सर्वांचेच आभार मानले. तसेच या विधेयकास एकमताने मंजुरी मिळाल्यानंतर हे विधेयक संमत करण्याची विनंती विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे केली. विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनीही हे विधेयक मंजूर झाल्याची घोषणा केली. त्यानंतर पुन्हा सभागृहाबाहेर सर्वांनीच जल्लोष सुरु केला.