|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » पश्चिम घाटाच्या शाश्वत रक्षणासाठी a नेते-अभिनेत्यांच्या जाण्याने जनता दुःखसागरात

पश्चिम घाटाच्या शाश्वत रक्षणासाठी a नेते-अभिनेत्यांच्या जाण्याने जनता दुःखसागरात 

तोंटदार्य मठाधीश, केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांच्या निधनाच्या धक्क्मयातून सावरले नाहीत तोच अंबरिश आणि त्यापाठोपाठ दुसऱया दिवशी माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे निधन झाले. हा संपूर्ण महिनाच दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे दुःखदायक असाच गेला.

 

राजकीय व धार्मिक क्षेत्रातील नेत्यांच्या निधनामुळे नोव्हेंबर महिना कर्नाटकाच्याबाबतीत दु:खदायक ठरला. महात्मा बसवेश्वरांच्या विचाराने प्रभावित होऊन धार्मिक क्षेत्रात अनेक सुधारणा घडवून आणणारे गदग येथील तोंटदार्य मठाचे जगद्गुरु डॉ. तोंटद सिद्धलिंग स्वामीजींच्या निधनाचा धक्का पचवता येत नव्हता तोच केंद्रीय मंत्री अनंतकुमार यांचे निधन झाले. त्यापाठोपाठ ज्ये÷ अभिनेते व माजी केंद्रीय मंत्री अंबरिश यांचेही निधन झाले. 24 नोव्हेंबर रोजी अंबरिश गेले, दुसऱया दिवशी माजी केंद्रीय मंत्री सी. के. जाफर शरीफ यांच्या निधनाची बातमी येऊन थडकली. राजकीय व धार्मिक क्षेत्रातील ज्ये÷ नेत्यांच्या निधनामुळे सारे राज्य दु:खसागरात बुडाले. राजकीय नेत्यांपेक्षाही चित्रपट क्षेत्रातील अभिनेत्यांना दक्षिणेत मोठा मान आहे. त्यांचा चाहतावर्गही मोठा असतो. एखाद्या अभिनेत्याचे निधन झाले की, त्याचा धक्का सहन न होता चाहते आत्महत्येचा मार्ग स्वीकारतात. अंबरिश यांच्या निधनानंतर त्यांच्या दोन चाहत्यांनी आपले जीवन संपविले.

अंबरिश यांची प्रकृती गेल्या काही वर्षांपासून नाजूकच होती. सिंगापूरमधील उपचारानंतर त्यात थोडीशी सुधारणा झाली होती. प्रकृती साथ देत नाही म्हणून राजकारणाला गेल्या निवडणुकीत राम राम ठोकून ते कलाक्षेत्रातच रमले होते. याच महिन्यात त्यांच्या निधनाच्या आधी काही दिवसांपूर्वी ‘अंबी निनगे वयस्साईतो’ (अंबी तुझे वय झाले) हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अंबरिश यांच्या निधनापूर्वी दोन दिवस आधी आता मी पत्रकारांशी बोलणार नाही. पत्रकार परिषदही घेणार नाही, अशी घोषणा करणाऱया मुख्यमंत्री कुमारस्वामी यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून क्षणाचाही विचार न करता पत्रकारांसमोर येऊन अंबरिश यांच्या निधनानंतरची परिस्थिती हाताळण्याची जबाबदारी सांभाळली. निधनाची घोषणा करण्यापासून ते अंत्यक्रियेपर्यंत संपूर्ण जबाबदारी कुमारस्वामी यांनीच आपल्या खांद्यावर घेतली होती. ती यशस्वीपणे निभावलीही. कुमारस्वामी हे सध्या राजकारणात असले तरी चित्रपट क्षेत्राशी त्यांचा जवळचा संबंध आहे. एकेकाळी ते स्वतः निर्माते होते. चित्रपट वितरणाचे कामही राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी केले आहे. आता त्यांचा मुलगा निखिल अभिनय क्षेत्रात आहे. त्यामुळे चित्रपट अभिनेत्यांशी कुमारस्वामी यांचा या ना त्या कारणाने निकटचा संबंध आहे. त्यांनी अत्यंत संयमाने परिस्थिती निभावली.

बेंगळूर येथील कंठीरवा स्टुडिओत अंबरिश यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सुपरस्टार रजनीकांत, चिरंजीवी, मोहनबाबू आदींसह तामिळ, तेलगू चित्रपट क्षेत्रातील अनेक दिग्गज अभिनेते बेंगळूर येथे आले होते. अंबरिश यांनी केवळ कन्नड चित्रपटात काम केले असले तरी भारतीय चित्रपटसृष्टीवर त्यांची पकड होती. बिग बी अमिताभ बच्चन यांच्यापासून ते रजनीकांत, चिरंजीवीपर्यंत त्यांचे जिव्हाळय़ाचे संबंध होते. अंबरिश यांच्या निधनानंतर चित्रपट क्षेत्रातील जुन्या पिढीचा अस्त झाला. डॉ. राजकुमार, विष्णूवर्धन यांच्यापाठोपाठ अंबरिश यांना मोठा मान होता. राजकारणात असताना कावेरीच्या मुद्दय़ावर केंद्रीय मंत्रीपदाचा राजीनामा देऊन त्यांनी आपला बाणा दाखवून दिला होता. मंडय़ा, म्हैसूर, हासन, बेंगळूर येथे तर त्यांचा मोठा पगडा होता. डॉ. राजकुमार यांच्या समाधीजवळच अंबरिश यांनी चिरशांती घेतली आहे. आता या दोन्ही दिग्गज अभिनेत्यांची कंठीरवामध्ये स्मारके उभारण्यात येणार आहेत. आणखी एक प्रसिद्ध अभिनेते विष्णूवर्धन यांची समाधी बेंगळुरात उभारायची की कुटुंबीयांच्या इच्छेप्रमाणे म्हैसूर येथे हलवायची, याविषयी वाद सुरू झाला आहे. विष्णूवर्धन यांच्या कुटुंबीयांनी कुमारस्वामी सरकारवर आरोपांच्या फैऱया झाडल्या आहेत. सँडलवूड अंबरिश यांच्या निधनामुळे सध्या दुःखात आहे. किमान अशा परिस्थितीत तरी स्मारकाच्या मुद्दय़ावरून वाद नको, असा सल्ला काही ज्ये÷ांनी दिला असला तरी विष्णूवर्धन यांचे चाहते व त्यांच्या कुटुंबीयांनी स्मारकाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आणला आहे.

गेल्या शनिवारी 24 नोव्हेंबर रोजी मंडय़ा जिल्हय़ातील पांडवपूर तालुक्मयातील कणगनमर्डी येथे खासगी बस नाल्यात उलटून 30 प्रवासी दगावले. मंडय़ा हा अंबरिश यांचा मातृजिल्हा. आपल्याच जिल्हय़ात झालेल्या या प्राणहानीचा त्यांना मोठा धक्का बसला होता. काही खासगी वाहिन्यांशी संपर्क साधून बस दुर्घटनेतील मृतांना त्यांनी श्रद्धांजलीही वाहिली होती. घटनास्थळी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करण्याची इच्छा आहे. प्रकृती साथ देत नाही. त्यांच्यापर्यंत माझ्या भावना पोचवा, अशी विनवणी त्यांनी केली होती. त्यानंतर एक-दोन तासांत त्यांचे निधन झाले. तोंटदार्य मठाधीश, केंद्रीयमंत्री अनंतकुमार यांच्या निधनाच्या धक्क्मयातून सावरले नाहीत तोच अंबरिश आणि त्यापाठोपाठ दुसऱया दिवशी माजी केंद्रीयमंत्री सी. के. जाफर शरीफ यांचे निधन झाले. हा संपूर्ण महिनाच दिग्गज नेत्यांच्या निधनामुळे दुःखदायक असाच गेला. एकीकडे खासगी वाहिन्यांवर अंबरिश यांच्या निधनानंतर मेगाकव्हरेज सुरू होते. दुसऱया दिवशी जाफर शरीफ यांच्या निधनाची बातमी आली ती केवळ ब्रेकिंग न्यूजपुरती मर्यादित राहिली. जाफर शरीफ हे माजी केंद्रीय रेल्वे मंत्री होते. आपल्या मंत्रिपदाच्या कारकिर्दीत रेल्वे खात्यात त्यांनी अनेक बदल घडवून आणले. इंदिरा गांधी यांचे ते जवळचे सहकारी होते. सिद्धरामय्या सरकारच्या काळात कर्नाटक काँग्रेसमध्ये झालेला बदल, उपऱयांचे वर्चस्व याबद्दल त्यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली होती. चित्रपट आणि राजकीय क्षेत्रात झळकलेल्या अंबरिश यांच्याबद्दलच्या मेगा कव्हरेजसमोर जाफर शरीफ यांची बातमी झाकोळली गेली.

राजकीय व धार्मिक क्षेत्रातील चार दिग्गजांच्या निधनामुळे शोकसागरात बुडालेल्या कर्नाटकातील राजकीय क्षेत्रात बुधवारी 28 नोव्हेंबर रोजी आणखी एक महत्त्वाची घटना घडली आहे. माजी मुख्यमंत्री बी. एस. येडियुराप्पा यांनी पाटबंधारे मंत्री डी. के. शिवकुमार यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली आहे. यावेळी खासदार प्रभाकर कोरे, येडियुराप्पा यांचे चिरंजीव खासदार बी. वाय. राघवेंद्र, विधान परिषद सदस्य महांतेश कवटगीमठ आदींसह बेळगाव व शिमोगा जिल्हय़ातील भाजपचे काही नेते येडिंसमवेत होते. शिवकुमार यांच्यावर तेलंगणा निवडणुकीची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. येडियुराप्पा आपल्या घरी येणार याची माहिती मिळताच शिवकुमार यांनी तेलंगणा दौरा रद्द करून भाजप नेत्यांची भेट घेतली आहे. पाटबंधारे योजनांना चालना देण्यासाठी शिवकुमार यांना भेटून आपण सहकार्याची अपेक्षा केल्याची माहिती येडियुराप्पा यांनी दिली असली तरी शिवकुमार यांना भाजपमध्ये ओढण्यासाठीच्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून ही भेट नसणार ना, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

Related posts: