|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » क्रिडा » महाराष्ट्र राज्य स्नूकर स्पर्धेत यासिन मर्चंट विजेता

महाराष्ट्र राज्य स्नूकर स्पर्धेत यासिन मर्चंट विजेता 

वृत्तसंस्था /मुंबई :

खार जिमखान्याच्या यासिन मर्चंटने बीएसएएम महाराष्ट्र राज्य वरि÷ांच्या स्नूकर व बिलियर्ड्स चॅम्पियनशिपच दुसऱया टप्प्यात स्नूकरचे जेतेपद पटकावले.

दोन वेळा आशियाई स्नूकर चॅम्पियनशिप मिळविलेल्या मर्चंटने अंतिम लढतीत क्रिकेट क्लब ऑफ इंडियाच्या मुकुंद भराडियाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. मुकुंदला या लढतीत फारसा सूर गवसला नाही. त्यामुळे मोठे बेक्स मिळविण्याच्या संधी त्याला साधता आल्या नाहीत. मर्चंटने ही लढत 69-28, 60-47, 70-47, 64-33 अशा गुणांनी जिंकून जेतेपद निश्चित केले. स्पर्श फेरवानी व भराडिया यांना महाराष्ट्राचे नंबर 1 व नंबर 2 क्रमांकाचे खेळाडू होण्याचा मान मिळाला. दोंघांनीही 12 गुण मिळविले. पण टायब्रेकमध्ये फेरवानीने बाजी मारत पहिले स्थान पटकावले. फेरवानीने पहिला टप्पा गुण जिंकून 9 गुण मिळविले आणि येथील स्पर्धेत तो उपांत्यपूर्व फेरीत पराभूत झाल्याने त्याला 3 गुण मिळाले. भराडियाने पहिल्या टप्प्यात उपांत्य फेरी गाठली होती. त्याचे 5 गुण आणि या स्पर्धेत दुसऱया स्थानासह 7 गुण मिळाल्याने एकूण 12 गुण झाले होते. हिंदू जिमखान्याच्या आनंद रघुवंशीने 8 गुणांसह चौथे स्थान मिळाले. मर्चंटने 9 गुण घेत तिसरे मानांकन मिळविले.

Related posts: