|Monday, December 9, 2019
You are here: Home » Top News » एडिफाय इंटरनॅशनल स्कूलतर्फे नुकतीच दिवाळी साजरी

एडिफाय इंटरनॅशनल स्कूलतर्फे नुकतीच दिवाळी साजरी 

ऑनलाईन टीम / पुणे  :

    एडिफाय इंटरनॅशनल स्कूलमध्ये शाळेच्या विद्यार्थ्यांनी आणि कर्मचाऱ्यांनी नुकतीच दिवाळी उत्साहात साजरी केली. दिवाळीच्या या कार्यक्रमाची सुरुवात शाळेच्या मुख्याध्यापिका प्रिया आनंद यांनी दीप प्रज्वलन करून केली.

यावेळी बोलताना प्रिया आनंद म्हणाल्या की, एडीफाय स्कूल नेहमीच विद्यार्थांना चांगले शिक्षण देण्याचा प्रयत्न करत असते. आमच्या शाळेमध्ये विद्यार्थांना असे शिक्षण दिले जाते की, जे विद्यार्थांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी तसेच तत्यांच्या कौशल्य विकासासाठी मदत करेल.

दिवाळीच्या या कार्यक्रमामध्ये प्रिया आनंद यांनी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत केले. तसेच त्यांनी विद्यार्थ्यासोबत मिठाई वाटून आणि फटाके फोडून दिवाळी साजरी केली.

Related posts: