|Monday, September 23, 2019
You are here: Home » leadingnews » मराठा आरक्षण आजपासून राज्यभरात लागू

मराठा आरक्षण आजपासून राज्यभरात लागू 

ऑनलाईन टीम / मुंबई :

‘आता आंदोलन नको, 1 डिसेंबरला जल्लोष करा,’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हे आश्वासन अखेर प्रत्यक्षात आले आहे. कारण मराठा आरक्षणाचा कायदा आजपासून राज्यभरात लागू झाला आहे.

मराठा आरक्षणाच्या विधेयकावर राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर राज्य सरकारने राजपत्र जाहीर केले आहे. मराठा आरक्षण लागू करण्यासंदर्भात सर्व वैधानिक आणि प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण झाली असून मराठा आरक्षणाच्या विधेयकाचे कायद्यात रुपांतरण झाले. त्यामुळे मराठा आरक्षणाचा कायदा आजपासून म्हणजेच 1 डिसेंबर 2018 पासून अखेर राज्यभरात लागू झाला आहे. 29 नोव्हेंबर रोजी विधीमंडळात मराठा आरक्षण विधेयकाला एकमताने मंजुरी मिळाली. त्यानंतर काल (30 नोव्हेंबर) मराठा आरक्षण विधेयकावर राज्यपालांनी स्वाक्षरी केली. राज्यपालांच्या स्वाक्षरीनंतर आज राजपत्रात अधिसूचना निघाली आहे. यामुळे मराठा आंदोलनाला मोठे यश मिळाले.