|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » क्रिडा » ट्रेव्हिस हेडला निल्सनच्या टिप्स

ट्रेव्हिस हेडला निल्सनच्या टिप्स 

वृत्तसंस्था/ऍडलेड

6 डिसेंबरपासून ऍडलेड येथे भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या क्रिकेट कसोटीला प्रारंभ होणार आहे. या कसोटीत भारतीय संघातील अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनच्या फिरकी माऱयाला समर्थपणे तोंड देण्यासाठी ऑस्ट्रेलियन संघातील डावखुरा फलंदाज ट्रेव्हिस हेड आता हॅरी निल्सनकडून टिप्स घेणार आहे.

क्रिकेट ऑस्ट्रेलिया इलेव्हन आणि भारत यांच्यातील नुकत्याच झालेल्या सरावाच्या सामन्यात ऑस्ट्रेलिया इलेव्हन संघाकडून खेळताना निल्सनने शतक झळकविले होते. या सामन्यात अश्विनची गोलंदाजी फारशी प्रभावी ठरली नाही. त्याने 122 धावांत 2 गडी बाद केले. या सरावाच्या सामन्यात निल्सनने अश्विनच्या फिरकीला चोख प्रत्युत्तर दिले. आता ऑस्ट्रेलियन संघातील फलंदाज हेड आपल्यापेक्षा नवखा असलेल्या निल्सनकडून महत्त्वाच्या टिप्स् घेणार आहे.

पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियन संघ डावखुऱया फलंदाजांना अधिक संधी देईल, असा अंदाज आहे. डावखुऱया फलंदाजांना लवकर बाद कसे करता येईल याचे डावपेच अश्विनकडे निश्चतच आहेत. ऍडलेडच्या पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाचे वेगवान गोलंदाज कर्णधार कोहलीवर दडपण आणण्याचा प्रयत्न करतील. या कसोटीसाठी उजव्या हाताने फलंदाजी करणाऱया सहा खेळाडूंना संधी मिळाली तर रविंद्र जडेजाला आपल्या गोलंदाजींची चुणूक दाखविता येईल, असा अंदाज आहे.

Related posts: