|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » Top News » आनंद पसरवा, आफवा नाही, व्हॉट्सऍपकडून वर्तमानपत्रात जाहीरात

आनंद पसरवा, आफवा नाही, व्हॉट्सऍपकडून वर्तमानपत्रात जाहीरात 

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :

व्हाट्सऍपवर मोठ्या प्रमाणात अफवा पसरवणाऱया पोस्ट, फोटो, व्हिडीओ वायरल केले गेल्यामुळे अनेकांचे जीव गेले आहेत. त्यामुळे आज व्हाट्सऍपकडून वर्तमानपत्रात जाहिरात देऊन जनजागृती करण्यात आली आहे. पोस्ट फेक आहे, हे कसे ओळखायचे याची माहिती या जाहिरातीत देण्यात आली आहे. यासोबतच आनंद पसरवा, अफवा नाही, असा संदेशही या जहिरातीतून देण्यात आला आहे.

 

भारतात एकूण 20 कोटी व्हाट्सऍप वापरकर्ते आहेत. त्यासोबतच पोस्टची सत्यता न पडताळता पोस्ट वायरल करणाऱयांची संख्याही जास्त आहे. व्हाट्सऍपच्या फेक पोस्टमुळे जातीय दंगली सारख्या घटना घडल्या आहेत. नुकतेच गोवर-रुबेला लसीमुळे नपुंसकत्व येत असल्याची अफवा पसरल्याने देखील खळबळ उडाली होती. म्हणून अशा फेक पोस्टवर आळा घालने गरजेचे असल्याने व्हाट्सऍपने हे पाऊल उचलले आहे. काही दिवसापूर्वीच व्हाट्सऍपने फॉरवर्डेड मेसेज ओळखण्यासाठीचा नवीन फीचर देखील अपडेट केला आहे.