|Sunday, August 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » नव्या वर्षारंभी होणार ओव्हरब्रिज वाहतूकीस खुला

नव्या वर्षारंभी होणार ओव्हरब्रिज वाहतूकीस खुला 

प्रतिनिधी/ बेळगाव

खानापूर रोडच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून पंधरा दिवसात पुलाचे काम पुर्ण करण्याचे उद्दीष्ट रेल्वे खात्याने ठेवले आहे. यादृष्टीने उर्वरीत कामे पुर्ण करण्याचे काम युध्दपातळीवर करण्यात येत आहेत. यामुळे नव्या वर्षात ओव्हरब्रिज वाहतूकीसाठी खुला होणार का? याकडे शहरवासियांचे लक्ष लागले आहे.

ओव्हरब्रिजच्या दोन्ही बाजूच्या गर्डरचे काम पुर्ण झाले असून पुलाच्या दोन्ही बाजूच्या रस्त्याचे काम आणि पुलाच्या रंगरंगोटीचे काम करण्यात येत आहे. पंधरा दिवसात काम पुर्ण करण्याची सुचना रेल्वे खात्याला देण्यात आली आहे. यामुळे काम पुर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवून उर्वरीत कामे पुर्ण करण्यासाठी रेल्वे खात्याने कंबर कसली आहे. रेल्वे मार्गादरम्यानच्या गर्डरवर स्लॅब घालण्यात आले आहे. तसेच सुरक्षेच्यादृष्टीने लोखंडी गर्डर बसवून जाळी लावण्यात येत आहे. दोन्ही बाजूने असलेल्या रस्त्याच्या दुभाजकाचे काम पुर्ण झाले आहे. तसेच रस्ता करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. रस्त्यावर माती आणि बोर्डर घालून सपाटीकरण करण्यात येत आहे. सदर काम पुर्ण झाल्यानंतर डांबरीकरणाचे काम करण्यात येणार आहे. यामुळे लवकरच पुलाचे काम पुर्ण होईल असे रेल्वे खात्याचे अधिकारी सागंत आहेत. त्याचप्रमाणे रंगरंगोटीचे कामदेखील युध्दपातळीवर सुरू आहे. ओव्हरब्रिजची महत्वाची कामे पुर्ण झाली असून किरकोळ कामे करण्यात येत आहेत.

ओव्हरब्रिजचे काम दि. 15 पर्यत पुर्ण करण्यासाठी रेल्वे खात्याला डेडलाईन देण्यात आली आहे. यामुळे सदर काम करण्यात येत आहे. ओव्हरब्रिजच्या उद्घाटनाचा मुर्हूत अद्याप निश्चित झाला नाही. पण दि. 25 रोजी ओव्हरब्रिजचे उद्घाटन हाईल अशी अपेक्षा आहे. यादृष्टीने रेल्वे खात्याने कामाची गती वाढविली आहे. दि. 25 पर्यत कामे पुर्ण होतील का याकडे लक्ष लागले आहे. नव्या वर्षारंभी नवीन ओव्हरब्रिज वाहतूकीसाठी खुला होईल अशी अपेक्षा आहे.

चौकट करणे   खास फुटपाथची सोय

शहरातील तीन रेल्वे फाटकावर उड्डाणपुल उभारण्याचे काम यापुर्वी पुर्ण झाले आहे. पण एकाही पुलावर पादचाऱयांना ये-जा करण्यासाठी फुटपाथची सुविधा उपलब्ध करण्यात आली नाही. यामुळे कपिलेश्वर उड्डाणपुल आणि छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपुलावर पादचाऱयांना ये-जा करणे धोकादायक बनले आहे. यामुळे खानापुर रोड ओव्हरब्रिजवर उड्डाणपुल उभारण्याची मागणी करण्यात आली होती. याची दखल घेत ओव्हरब्रिजवर पादचाऱयांना रस्त्याच्या दुतर्फा खास फुटपाथ निर्माण करण्यात आले आहे.