|Sunday, December 8, 2019
You are here: Home » Top News » राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत : प्रकाश आंबेडकर

राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत : प्रकाश आंबेडकर 

ऑनलाईन टीम / मुंबई

लोकसभा निवडणुकीआधी राम मंदिराच्या मुद्यावरून दंगली घडवण्याचा कट रचला जातोय, असा आरोप मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केल्यानंतर राजकीय वर्तुळात शब्दयुद्ध सुरू झाले आहे. परंतु, या कटाबद्दल आपण आधीच बोललो होतो, राज ठाकरे माझी कॉपी करत आहेत, असा टोला भारिप बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आज लगावला.

 

’राम मंदिराच्या मुद्यावर दंगल घडवायची आणि समाजात भय निर्माण करायचे. त्यातून पुन्हा सत्ता मिळवायची, असा पंतप्रधन नरेंद्र मोदी यांचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी गेल्या महिन्यात वंचित बहुजन आघाडीच्या पुण्यातील सभेत केला होता. नेमका हाच विषय राज ठाकरे यांनी विक्रोळी येथील सभेत मांडला. ओवैसी बंधूंच्या मदतीने राम मंदिराच्या मुद्यावरून हिंदू-मुस्लीम दंगलीचा कट रचला जात असल्याचे त्यांनी म्हटलंय. त्यावरून शिवसेनेनं आणि एमआयएमचे नेते असदुद्दीन ओवैसी यांनी राज यांची खिल्ली उडवली आहे. 

Related posts: