|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » लोकसभा जिंकण्यासाठी बुथ रचनेकडे प्राधान्याने लक्ष द्या

लोकसभा जिंकण्यासाठी बुथ रचनेकडे प्राधान्याने लक्ष द्या 

प्रतिनिधी / सोलापूर :

पूर्वी राजकारणात व्यक्ती प्रमुख होता. परंतु आता त्याचे विभाजन जिल्हा, मंडल, मोर्चा, बुथ अशा पद्धतीने झाले आहे, त्यामुळे लोकसभा जिंकण्यासाठी बुथ रचनेकडे प्राधान्याने लक्ष द्या, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांनी केले. 

    भारतीय जनता पार्टीच्या लोकसभा क्लस्टर बैठकीचे आयोजन हॉटेल सूर्या येथे गुरुवार 6 डिसेंबर रोजी सकाळी साडेअकरा वाजता महाराष्ट्र प्रदेश प्रभारी सरोज पांडे यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना त्या बोलत होत्या. यावेळी बैठकीला महापौर शोभा बनशेट्टी, सहकारमंत्री सुभाष देशमुख, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खासदार अमर साबळे आदींची प्रमुख उपस्थिती होती.

    पुढे पांडे म्हणाल्या, सोशल मीडियाचा प्रभावी व अचूक वापर यंदाच्या निवडणुकीतही व्हावा तसेच विचारातून आणि कृतीतून मतदारांचे मन जिंकले पाहिजे. यावेळी येथील पक्षाच्या कामकाजाचा आढावा घेतला.

    यावेळी सहकारमंत्री देशमुख म्हणाले, शासकीय योजनांचा लाभ मिळालेल्या लाभार्थ्यांची माहिती घेवून सकारात्मकता पसरवावी. मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 26 कोटींचा निधी जिह्याला मिळाला आहे. यातून 2 हजार 810 नागरीक आपल्याशी जोडले गेले आहेत. या बैठकीस भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Related posts: