|Thursday, September 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » लोकशाहीचा खून करणाऱया भाजपाला कायमचेच घरी बसवा : डॉक्टर चेल्लाकुमार

लोकशाहीचा खून करणाऱया भाजपाला कायमचेच घरी बसवा : डॉक्टर चेल्लाकुमार 

पेडणे (प्रतिनिधी ) :

 गोव्याचे मुख्यमंत्री कुठे आहेत हे कोणालाच माहीत नाही. त्यांच्या आजारपणातून भाजपने खोटारडेपणाचा कळस गाठला आहे. राज्यात सरकार आहे ही नाही? हाच मोठा प्रश्न आहे. लोकशाहीचा खून करू पाहणाऱया भाजपा सरकारला आता गोमंतकीयांनी कायमचेच घरी बसवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन गोवा काँग्रेसचे प्रभारी डॉ. चेल्लाकुमार यांनी काँग्रेसच्या ‘जन आक्रोश’ आंदोलनात पेडणे येथे केले.

 गोवा प्रदेश काँग्रेस व पेडणे गट काँग्रेस समिती आयोजित जन आक्रोश आंदोलन काल 6 रोजी पेडणे ट?क्सी स्टँ?ड येथे आयोजित केले होते. त्यावेळी डॉ. चेल्लाकुमार बोलत होते. व्यासपीठावर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, उपाध्यक्ष बाबी बागकर, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, माजी केंद्रीयमंत्री रमाकांत खलप, माजी शिक्षणमंत्री संगीता परब, उत्तर गोवा अध्यक्ष विजय भिके, सचिव सुभाष केरकर, पेडणे गट काँग्रेस अध्यक्ष उमेश तळवणेकर, दिव्या शेटकर, उत्तर गोवा महिला अध्यक्ष वैशाली शेटगावकर, रेखा परब, विवेक डिसिल्वा, हरमल माजी सरपंच डेनियल फर्नांडिस, मांदे प्रभारी गट अध्यक्ष नारायण रेडकर, मुक्ता गोवेकर, मेघश्याम राऊत, एम के, शेख, युवा नेते सचिन परब, राजन घाटे, आनंद नाईक, नजीर शेख, पूजा मयेकर, उर्मिला नाईक, अनुसूया कांबळी, प्रसाद आमोणकर, दशरथ महाले, मुरारी परब आदी उपस्थित होते.

 पर्रीकरांची खोटी आश्वासने

 भाजपने 2012 च्या विधानसभा निवडणुकीत खोटी आश्वासने देवून मागच्या दाराने सत्ता मिळवली. राज्याला खास दर्जा देण्याच्या खोटय़ा आश्वासनाला हरताळ फासला. गोवेकाराना फसविण्याचा हातखंडा मुख्यमंत्री पर्रीकर यांच्याकडे आहे. गोवेकाराना फसवण्यासाठी परिवर्तन यात्रा काढली आणि सत्ता मिळवली. पर्रीकरांनी खनिज व्यवसाय बंद केला, बेरोजगाराना रोजगार नाही, दिलेली 10 टक्के आश्वासने सुध्दा भाजपाने पूर्ण केली नाहीत. आता भाजपाला घरचा रस्ता दाखवा, असे आवाहन चेल्लाकुमार यांनी केले.

 सरकार अस्तित्वात नाही : चोडणकर

  गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी बोलताना गोव्याचा हा आक्रोश सर्वांपर्यंत पोचला पाहिजे, आणि त्याची सुरुवात आज पेडणे तालुक्मयातून होत आहे. भर उन्हातही नागरिक या सभेला उपस्थित असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मागच्या नऊ महिन्यापासून राज्यात सरकार नाही, असेही ते म्हणाले.