|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » बेरोजगारांना भजी विकण्याचा सल्ला देणे ही तर त्यांची क्रूर थट्टा : अजित पवार

बेरोजगारांना भजी विकण्याचा सल्ला देणे ही तर त्यांची क्रूर थट्टा : अजित पवार 

ऑनलाईन टीम /मुंबई :

तंत्रज्ञानाच्या युगात आंबा खाण्याचा सल्ला देणारे पा दिवाळखोर आहेत. तसेच पंतप्रधन बेरोजगार युवकांना भजी विकण्याचा सल्ला देत आहेत ही बाब म्हणजे त्यांची थट्टा आहे असा आरोप अजित पवार यांनी केला आहे. तुम्हाला बेरोजगारांसाठी काहीही करता आलेले नाही असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. मोदी सरकारने सत्तेवर येताना दोन कोटी रोजगार दरवषी देऊ असे आश्वासन दिले होते. ते आश्वासन हवेत विरले का? असाही प्रश्न अजित पवारांनी उपस्थित केला आहे.

मोदी सरकार सगळय़ा आघाडय़ांवर अपयशी ठरले आहे. येत्या निवडणुकांमध्ये जनता त्यांना घरी बसवेल. जनतेचे प्रश्न असोत, महिलांचे असोत किंवा युवकांचे प्रश्न असोत कोणताही प्रश्न या सरकारला सोडवण्यात यश आलेले नाही असेही अजित पवारांनी म्हटले आहे. नाना काटे सोशल फाऊंडेशनच्या वतीने शनिवारी सांगवीतील बाबुरावजी घोलप महाविद्यालयात जॉब फेअर’चे उद्घाटन पवार यांच्या हस्ते करण्यात आले. याच कार्यक्रमात त्यांनी भाजपावर टीकेचे ताशेरे ओढले.

21 व्या शतकात भारताने विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात उत्तुंग झेप घेतली आहे. इस्$ााs जगभरातील शेकडो देशांचे उपग्रह भारतातून प्रक्षेपित करते. तर दुसरीकडे प्रतिगामी विचाराची व्यक्ती आंबा खाण्याचा’ सल्ला देते. अशा विचारवंतांची कीव येते असेही अजित पवार यांनी म्हटले आहे. किव येते, असे म्हणत भिडे गुरुजींवर नाव न घेता टीका केली. युवकांना सल्ला देताना ते म्हणाले, बेरोजगारांनी नाउमेद न होता नैराशयातून व्यसनाधीन होऊ नये असेही आवाहन यावेळी त्यांनी केले.

Related posts: