|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » मनोरंजन » ‘मुळशी पॅटर्न’ची 11 दिवसात 11 कोटींची कमाई

‘मुळशी पॅटर्न’ची 11 दिवसात 11 कोटींची कमाई 

सामाजिक विषयावरील मुळशी पॅटर्न या मराठी चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर प्रेक्षकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. प्रवीण तरडे लिखित, दिग्दर्शित या चित्रपटाने कोणत्याही मोठय़ा स्टुडिओच्या पाठबळाशिवाय केवळ माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर 11 दिवसात 11 कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल्पनिक कथेवर आधारित, वास्तवाच्या जवळ जाणाऱया या चित्रपटाला शहरी, निमशहरी आणि ग्रामीण भागात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून प्रेक्षक सहकुटुंब चित्रपट पाहण्यासाठी येत आहेत.

मुळशी पॅटर्न हा चित्रपट पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, जळगाव, यवतमाळ, औरंगाबाद, कोल्हापूर, सांगली, सातारा, बारामती, इंदापूर, नगर, श्रीरामपूर, शिरुर, सोलापूर, दौंड, लोणावळा, सांगोला, जेजुरी, पंढरपूर, जालना, बीड, नांदेड, लातूर, परभणी, अकोला, बुलढाणा, धुळे, मालेगाव, जामखेड, अमरावती, खेड, कणकवली, देवगड, राहुरी, टेंभूर्णी, सिन्नर, अकलूजसह पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा, कोकणात सर्व छोटय़ा-मोठय़ा गावात प्रेक्षकांची पसंती मिळवत आहे. पहिल्या आठवडय़ात चित्रपटाचे 358 हून अधिक चित्रपटगफहात 755 पेक्षा जास्त शो होते. सुपरस्टार रजनीकांत आणि अक्षयकुमार यांचा 2.0 चित्रपट प्रदर्शित झालेला असतानाही मुळशी पॅटर्नच्या लोकप्रियतेवर परिणाम झाला नाही. या चित्रपटाची निर्मिती अभिजित भोसले जेन्युईन प्रॉडक्शन्स आणि पुनीत बालन एंटरटेनमेंट  यांची आहे.

मराठी चित्रपट विपेंडला हाऊसफुल होतात. मात्र, माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर ‘मुळशी पॅटर्न’ विकडेजला सुद्धा हाऊसफुल असल्याचे दिसते. 2 ते 3 वेळा चित्रपट पाहणाऱया प्रेक्षकांची संख्याही मोठी आहे. बॉक्स ऑफिसवर दमदार कामगिरी करणाऱया या चित्रपटाने प्रमोशनमध्येही नवा पॅटर्न निर्माण केला आहे. मराठी चित्रपटाचा कलाकारांच्या उपस्थितीत प्रीमियर शो किंवा प्रमोशन म्हटलं की, मुंबई-पुणे व्यतिरिक्त महाराष्ट्रातील इतर शहरांचा विचार होत नाही. मात्र, मुळशी पॅटर्नचे प्रीमियर शो नाशिक, औरंगाबाद, सातारा, सोलापूर या शहरामध्ये करण्यात आले. मुळशी पॅटर्नचे प्रस्तुतकर्ते अभिजित भोसले जेन्यूइन प्रॉडक्शन्स आणि किरण  पाटील प्रॉडक्शन आहेत.

Related posts: