|Monday, September 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » सर्व हिंदू बांधवांनी एकसंघ होण्याची गरज

सर्व हिंदू बांधवांनी एकसंघ होण्याची गरज 

उदय सावंत/ वाळपई

हिंदू समाजामुळेच भारताला वैभवशाली परंपरा प्राप्त झालेली आहे. हिंदू समाजाला नष्ट करून भारतामध्ये इस्लामिक सत्ता स्थापन करण्याचे आंतरराष्ट्रीय पातळीवरून मोठे षडयंत्र रचले जात आहे. ब्राह्मण समाज हा हिंदू धर्मातील महत्त्वाचा घटक असून ब्राह्मण समाजालाच जर नष्ट केले तर आपोआपच भारतामधील हिंदूचे साम्राज्य नष्ट होईल, यासाठी जागतिक स्तरावरून रचण्यात येत असलेले षडयंत्र परतवून लावायचे असेल तर देशातील सर्व हिंदू बांधवांनी एकसंघ होणे अत्यंत गरजेचे आहे, असे प्रतिपादन मुंबई येथील आयआयटी फॅकल्टी वरदराज बापट यांनी केले आहे.

 ब्राह्मण समाजाने आतापर्यंत हिंदू धर्मियांना एकसंघ होण्यासाठी महत्वाचे कार्य केले असून येणाऱया काळात या समाजाला बदनाम करण्याच्या षडयंत्राला समर्थपणे तोंड द्यायचे असेल तर अशा प्रकारच्या महामेळाव्याच्या माध्यमातून ब्राह्मण ज्ञाती बांधवांनी एकसंघ होण्याची काळाची गरज असल्याचेही बापट यांनी सांगितले.

 गोमंतक ब्राह्मण महासंघ यांच्यातर्फे कदंब बस स्थानकावर पंडित महादेवशास्त्री जोशी सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ब्राह्मण महामेळाव्याच्या उद्घाटन समारंभात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. त्यांनी आपल्या भाषणातून ब्राह्मण समाजाची प्रति÷ा व आतापर्यंत या समाजाने वेगवेगळय़ा स्तरावर इतर समाजाच्या विकासासाठी दिलेले योगदान यावर प्रकाशझोत टाकला.

 व्यासपीठावर ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गुरुदास मोने, अखिल विश्व गोसंवर्धन केंद्राचे व्यवस्थापक रामचंद्र जोशी, आयोजन समितीचे अध्यक्ष ऍड. सुदिन मराठे, स्वागताध्यक्ष पुरुषोत्तम ऊर्फ प्रसाद खाडिलकर, महासंघाचे कोषाध्यक्ष जयंत मिरींगकर, आयोजन समितीचे सचिव वामन बापट व इतरांची खास उपस्थिती होती.

 वर्तनातून ब्राह्मणत्व सिद्ध केलेले

 वरदराज बापट यांनी पुढे सांगितले की या देशातील ब्राह्मण समाज हा लढवय्या आहे. आतापर्यंत या समाजाने चित्रपटनिर्मिती, कलाकार, वैज्ञानिक, स्वातंत्र्यलढय़ात विशेष योगदान दिले आहे. ब्राह्मणांनी आतापर्यंत आपल्या वर्तनाच्या माध्यमातून ब्राह्मणत्व सिद्ध केले आहे. येणाऱया काळात आपली गुणवत्ता सिद्ध करणे गरजेचे असून इतर समाजाच्या विकासासाठी वेगवेगळय़ा स्तरावरून योगदान देणे काळाची गरज आहे. या समाजाला प्राचीन काळापासून परशुरामाचा आदर्श असून एका बाजूने ब्राह्मणतेज तर दुसऱया बाजूने शौर्य या दोन्ही मानवी गुणाच्या माध्यमातून परशुरामाने एक वेगळा असा आदर्श निर्माण केलेला आहे. येणाऱया काळातही ब्राह्मण समाजाने वेगवेगळय़ा प्रकारच्या आव्हानांना समर्थपणे तोंड देण्यासाठी एकसंघ होणे अत्यंत गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 इस्लामिक राज्य स्थापन करण्याचे षडयंत्र

आतापर्यंत इस्लामिकानी अनेक देशांमध्ये आपली सत्ता निर्माण करण्यासाठी वेगवेगळय़ा स्तरांचा अवलंब केला आहे. भारतामधील काश्मीर भागात आज जवळपास 98 टक्के इतर धर्मीयांचे इस्लामिक धर्मात धर्मांतर झालेले आहे. मात्र अनेक प्रकारच्या आव्हानांना सामोरे जात काश्मीरच्या पंडितांनी आपला धर्म सुरक्षित ठेवलेला आहे. गोव्यात सातत्याने बदलणाऱया जीवनशैलीच्या ओघातही या राज्यातील ब्राह्मण समाज आपली भाषा व संस्कृती टिकून ठेवण्यासाठी यशस्वी झाल्याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.