|Monday, February 17, 2020
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आता लढाई मराठा उद्योजक निर्माण करण्याची

आता लढाई मराठा उद्योजक निर्माण करण्याची 

प्रतिनिधी/ सातारा

मराठा युवक उद्योजक बनला पाहिजे, याकरता अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या वतीने विविध कर्ज योजनांचा लाभ घेतला पाहिजे. मराठा युवक हा नेत्यांच्या मागे जिंदाबाद, मुर्दाबादच्या घोषणा देत फिरतो अन् स्वतःचे नुकसान करुन घेतो. मराठा उद्योजक किती बनलेत पहा. पानवाला पान तयार करुन देतो अन् इथे बंगला बांधतोय. टायरवाला पंक्चर काढून उद्योजक झाला. महामंडळाकडे 400 कोटी आहेत, त्याच्या व्याजातून आजपर्यंत चालवले जातेय. याच महामंडळाच्या योजना राज्यातील मराठा तरुणांपर्यंत पोहचवाच्या आहेत. मराठा युवकांना उद्योजक बनवायचे असून त्याकरिता आतापर्यंत 12 जिह्यात बँकर्सच्या बैठका घेतल्या आहेत. राज्यातील मराठा समाजाकरता आणि माथाडीकरता मी कार्यरत राहणार असल्याचे मत अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी ‘तरुण भारत’शी बोलताना व्यक्त केले.

साताऱयाच्या दौऱयावर आले असताना त्यांनी ‘तरुण भारत’च्या कार्यालयाला सदिच्छा भेट दिली. त्यांचे स्वागत ‘तरुण भारत’च्या वतीने आवृत्तीप्रमुख दीपक प्रभावळकर यांनी केले. त्यावेळी पाटील म्हणाले, अण्णासाहेब पाटील आर्थिक महामंडळ पूर्वीपासूनच अस्तित्वात आहे, परंतु पूर्वी या महामंडळामार्फत केवळ बी-बियाणांच्या योजना राबवल्या जात होत्या. त्या बंदही करण्यात आल्या. मराठा क्रांती मोर्चाने जेव्हा आंदोलने केली, तेव्हा नवीन योजना सुरु केल्या. मराठा समाजातील युवक हा उद्योजक व्हावा याकरिता कर्ज देण्याकरता या योजना पटलावर आणल्या गेल्या. मला पद मिळाल्यापासून फिल्ड वर्क ग्रास रुटला उतरुन करु लागलो आहे. माझे ध्येय हेच आहे की, मराठा समाजातील युवक हा उद्योगी बनला पाहिजे. माथाडी वर्गाच्या समस्या सुटल्या पाहिजेत. महामंडळाकडे 400 कोटी रुपये फंड आहे., त्याच्याच व्याजातून दर महिन्याला कर्ज प्रकरणे केली जात आहेत. जास्तीत-जास्त मराठा समाजातील युवकांनी लाभ घ्यावा याकरता मी राज्यभर दौरा सुरु केला आहे.

मराठा समाजातील युवकांची मनस्थिती बदलणे गरजेचे आहे. नेत्यांच्या पाठीमागे ज्ंिादाबाद, मुर्दाबाद म्हणत फिरतील; पण व्यवसाय करणार नाहीत. किती असे मराठा तरुण उद्योजक आहेत की ते मोठे झाले आहेत. आपल्या येथे पानवाला येतो पान तयार करुन देतो अन् बंगला बांधतो. टायरवाला येतो पंक्चर काढतो अन् उद्योजक बनतो. आपल्या लोकांची मानसिकता बदलली गेली पाहिजे. लोकांनी मानसिकता बदलणे गरजेचे आहे. आम्ही फक्त दहावी पास मराठा युवक मागतोय. उद्योगासाठी कर्ज दिले जाते. 12 जिह्यात बैठका घेतल्या आहेत. बँकर्ससोबत मराठा तरुणांच्या प्रकरणांना मंजुरी देण्याच्या सूचना दिल्या आहेत, असे त्यांनी सांगितले.

Related posts: