|Saturday, August 24, 2019
You are here: Home » Top News » पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुढील आठवडय़ात समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन

पंतप्रधान मोदींच्या हस्ते पुढील आठवडय़ात समृद्धी महामार्गाचे भूमिपूजन 

ऑनलाईन टीम / मुंबई :

नागपूर ते मुंबई हा दळणवळणासाठी उपयुक्त ठरणारा समृद्धी महामार्गातील अनेक अडथळय़ानंतर अखेर याचे भुमिपूजनचा मुहूर्त ठरला आहे. पुढील आठवड्यात 18 डिसेंबरला पंतप्रधन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते हा भुमिपूजनाचा कार्यक्रम होणार असून त्यासाठी मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. दरम्यान, ते मुंबई मेट्रोच्या कामांचे भुमिपूजनही करणार आहेत.

 

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्वाकांक्षी प्रकल्प समजला जाणारा समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनाचे काम जवळपास 90 टक्के पुर्ण झाले आहे. मात्र, सरकारला यासाठी शेतकऱ्यांचा मोठा रोष पतकारावा लागला होता. अद्यापही 10 टक्के शेतकरी आपली जमीन देण्यास तयार नसल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी राज्य शासन लवकरच समृद्धी महामार्गाच्या कामाला सुरवात करणार आहे. त्यासाठी येत्या 18 डिसेंबर रोजी पंतप्रधन नरेंद्र मोदींच्या हस्ते या प्रकल्पाचे भुमिपूजन करण्यात येणार आहे. एका वृत्तावाहिनीने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

महामार्ग उभारण्यासाठी लागणारे गौण खनिज मुरूम, दगड, माती सहज उपलब्ध व्हावी तसेच शेतकऱयांनाही याचा फायदा मिळावा, यासाठी ठेकेदार शेतकऱयांना मोफत शेततळे तयार करून देणार आणि यातून मिळणारे गौण खनिज महामार्गाच्या कामासाठी वापरणार आहे. यामुळे दुष्काळी भागातील शेतकऱयांना मोठय़ा फायदा होणार आहे. राज्य शासनाने यासाठी नुकतेच परिपत्रक काढले आहे.