|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » क्रिडा » मलिंगाची कर्णधारपदी फेरनिवड

मलिंगाची कर्णधारपदी फेरनिवड 

वृत्तसंस्था / कोलंबो

न्यूझीलंडच्या दौऱयावर जाणाऱया लंकन क्रिकेट संघाच्या कर्णधारपदी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाची फेरनिवड करण्यात आली आहे. या दौऱयात होणाऱया वनडे आणि टी-20 मालिकेत लंकेचे नेतृत्व मलिंगाकडे सोपविण्याचा निर्णय लंकन निवड समितीने घेतला आहे.

या दौऱयासाठी शुक्रवारी लंकेचा 17 जणांचा संघ जाहीर करण्यात आला. लंका आणि न्यूझीलंड यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका तसेच एकमेव टी-20 सामना खेळवला जाणार आहे. 2014 साली झालेल्या आयसीसीच्या टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत मलिंगाने लंकेचे नेतृत्त्व केले होते तर गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये  झालेल्या भारताविरुद्धच्या वनडे सामन्यात मलिंगाने लंकन संघाचे कर्णधारपद भूषविले होते. उभय संघातील एकमेव टी-20 सामना 3 जानेवारीला खेळवला जाईल.

लंकन संघ – मलिंगा (कर्णधार), डिक्वेला (उपकर्णधार), मॅथ्युज, गुणतिलका, के. परेरा, चंडीमल, गुणरत्ने, कुशल मेंडीस, धनंजय डिसिलव्हा, टी. परेरा, डी. शेनका, सॅडेंकेन, प्रसन्ना, चमिरा, रजीता, एन. प्रदीप आणि एल. कुमारा.