|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » आवृत्ती » गोवा » भाजप पक्षाला माणुसकी नाही

भाजप पक्षाला माणुसकी नाही 

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांचे उद्गार

प्रतिनिधी/ पणजी

गोव्यात 2018 या वर्षात केवळ जानेवारी महिन्यातच मुख्यमंत्री कार्यालयात हजर होते. अन्य 11 महिने मुख्यमंत्री कार्यरत नाहीत आणि ते कार्यालयात हजरही नव्हते. काँग्रेसने नेहमीच मुख्यमंत्री बरे व्हावेत म्हणून प्रार्थना केली आहेत तसेच त्यांना योग्यते सहकार्यही आजवर केले आहे पण भाजपने नेहमीच संवेदनशील गोमंतकीय जनतेला वेठीस धरुन आपली हुकुमशाही केली आहे. आज जी भाजपची परिस्थिती आहे ती काँग्रेसची असती तर भाजपने 3 प्रेतयात्रा काठल्या असत्या. भाजप पक्षाला माणुसकी नाही असे उद्गार काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर यांनी काढले.

जनआक्रोश आंदोलनाला काँग्रेस कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. यावेळी थिवीचे आमदार निळकंठ हळदणकर, काँग्रेस प्रवक्ता उफ्ढा&न मुल्ला, विजय भिके, एम. के. शेख, सायमन कायदो, तुलयो डिसोझा, प्रसाद आमोणकर, अमरनाथ पणजीकर, सुरेंद्र फ्gढर्तादो व इतर पदाधिकाऱयांचीही खास उपस्थिती होती. भाजप पक्षाने आजवर केलेल्या भ्रष्टाचार आणि हुकुमशाही यावर या जनआक्रोश आंदोलनाचा कल होता.

गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, भाजप सरकार हे आंधळे आणि बहिरा झालेला आहे. हे सरकार जनतेच्या एकाही प्रश्नाला उत्तर देत नाही. गोमंतकीय जनतेने काँग्रेस पक्षाला निवडले होते पण भाजपने आपल्या सत्तेचा वापर करून आपले सरकार जनतेवर लादले. केवळ त्यांना भ्रष्टाचार करायचा होता व लुटायचे होते म्हणून त्यांन सरकार स्थापन केले.

खाण, फ्ढाŸर्मेलिन यासारख्या विषयांनी जनतेला रस्त्यावर आणले. खाणप्रश्नावर आंदोलन केले असता त्यांच्यावर लाठीचार्य्ज केले. आज दिल्ली येथे तीन दिवस धरणे केले आहे पण त्यांना कुठल्याचप्रकारे उत्तर देण्यात आले नाही. असे निष्ठूर आणि निर्दयी हे सरकार आहे. खाणप्रश्नावर तोडगा काढण्यासाठी विशेष समिती स्थापन करण्यात येणार असल्याचे सरकारकडून सांगितले जाते. समिती स्थापन करूण 150 ते 200 कोटी मिळवायचे व ते पैसे मते विकत घेण्यासाठी खर्च करायचे असा भाजपचा विचार बसल्याचे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

गिरीश चोडणकर यांनी सांगितले की, काही दिवसांपुर्वी मंत्री प्रशासन ठप्प असल्याचे सांगत होते पण आता तेच मंत्री प्रशासन सुरळीत चालू असल्याचे सांगतात. या मंत्र्यांची कामे अडकून राहीली की प्रशासन ठप्प आणि त्यांची कामे सुरळीत असतील तर प्रशासन सुरळीत चालले आहे. असे मंत्री गोव्याला मिळाले हे दुर्देव आहे. प्रशासन ठप्प असल्याने आम्ही युतीतून बाहेर पडू असे युतीतल पक्षा सांगतात. या गोष्टीला आता 1 वर्षे पूर्ण झाली आहे पण ते सत्ता काही सोडत नाही असेही त्यांनी सांगितले.

गोव्याला मिळलेली राज्यपाल या सभ्रमावस्थेत आहेत व काय करावं ते त्यांना कळत नाही. काँग्रेस पक्षाने राज्यपालांची सातवेळा भेट घेतली पण त्याची दखल त्यांनी आजवर घेतली नाही. गोव्याच्या मुख्य सचिव आयएएस अधिकाऱयांच्या सांगण्यावरुन वागत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या आजाराचे रिपोर्ट पाहण्याचा अधिकार गोमंतकीय जनेला आहे. आम्ही मनोहर पर्रिकर यांचे रिपोर्ट मागत नाही तर मुख्यमंत्र्यांचे रिपोर्ट मागत आहोत असे स्पष्टपणे गिरीश चोडणकर यांनी सांगितले.

आमदार निळकंठ हळदणकर यांनी सांगितले की, सरकार हे नावापुरतेच आहे. शासन पुर्णपणे ठप्प झाले आहे. लोकांमध्ये याची जागृती होणे गरजेचे आहे व ते काम जनआक्रोशच्या माध्यमाने काँग्रेस करत आहेत. गोव्यातील सहनशील जनतेचा असा गैरफ्ढायदा भाजने घेऊ नये. इतर राज्यांमध्ये जर असे झाले असते तर त्या राज्यात दंगल झाली असती.

Related posts: