|Friday, November 15, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » उद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या

उद्योग क्षेत्रासमोर वीज दरवाढ ही गंभीर समस्या 

प्रतिनिधी/ कोल्हापूर

पश्चिम महाराष्ट्रात उद्योग क्षेत्राची अवस्था फार कांही चांगली नाही.आज उद्योगासमोर वीज दरवाढ ही मोठी गंभीर समस्या उभा आहे. यावर मार्ग काढण्यासाठी 20 रोजी बैठक घेण्याचे ठरले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स ऍन्ड इंडस्ट्रीजचे अध्यक्ष संतोष मंडलेचा यांनी केले.

    वेस्टर्न महाराज कनव्हर्जन 2018 या तीन दिवशीय औद्योगिक प्रदर्शनाचे उद्घाटन महापौर सौ सरिता मोरे यांच्या हस्ते शनिवारी करण्यात आले.  यावेळी ते बोलत होते. हे प्रदर्शन शाहुपूरी जिमखना मैदानावर सुरू झाले.

   यावेळी मंडलेचा म्हणाले, पश्चिम महाराष्ट्रातील उद्योगासमोर असलेली आव्हाने आणि संधी याबद्दल अशा प्रकारचे प्रदर्शन भरवणे गरजेचे आहे.उद्योजकांना एकत्रित करून व्यापाऱयाच्या संधी उपलब्ध करून देणे हाच प्रमुख उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. वीज दरवाढ करणे ही वीज कंपनीवर आधारीत आहे. ही दरवाढ ग्राहकावर लादली जात आहे. ही दरवाढ उद्योजकांना मारक ठरणार आहे. या दरवाढीच्या समस्येवर चर्चा करण्यासाठी 20 रोजी बैठक घेऊन विचारविनिमय करून शासनस्तरावर प्रयत्न करणार असल्याचे मंडलेचा यानीं सांगितले.

   महापौर सौ. सरिता मोरे म्हणाल्या, शेजारच्या राज्याशी औद्योगिक देवाण-घेवाण करून, महाराष्ट्राला औद्योगिक क्षेत्रात अव्वल करण्यात महाराष्ट्र चेंबरचा मोठा हात आहे. नवोदित उद्योजकांना हा चांगला पर्याय असून, याचा लाभ पश्चिम महराष्ट्रातील उद्योजकांना नक्कीच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी विक्रांत चव्हाण यांनी,कोल्हापूरच्या उद्योग विस्तारासाटी जागा शिल्लक नाही. तर कांही ठिकाणी उद्योजक जाण्यास तयार नाहीत. सातारा ,कोल्हापूर येथे 540 कोटीची गुंतवणूक करून, 3600 हेक्टर जागा घेतली आहे. बरेच भूखंड मोकळे असून,त्याठिकाणी उद्योगाची उभारणी होऊन,रोजगार निर्मिती होऊ शकते असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र चेंबरचे माजी अध्यक्ष आशिष पेडणेकर यांचे भाषण झाले. प्रास्ताविकात महाराष्ट्र चेंबरचे ललित गांधी यांनी, महाराष्ट्र चेंबरने यावर्षी प्रथमच यात सहभाग घेतला आहे. यामुळे या प्रदर्शनाची व्याप्ती वाढली आहे. आज महाराष्ट्रात ही संस्था मराठी उद्योजकांना उद्योगक्षेत्रात येण्यासाटी प्रवृत करत असून, ही संस्था शतकपूर्तीकडे वाटचाल करत असल्याचे सांगितले. यावेळी महाराष्ट्र चेंबरचे वरिष्ठ उपाध्यक्ष अनिल कामत, उपाध्यक्ष अनिल लोढा, शुभांगी तिरोडकर, सारस्वत बँकेचे प्रवीण तपारिया,अजित बिरवाडकर आदींचा सत्कार करण्यात आला. तसेच प्रदर्शनाच माहीतीचे पत्रक व अमर वझलकर,अनिरूध्द देशपांडे यांच्या चक्रव्यूह या पुस्तकाचे प्रकाशन यावेळी करण्यात आले.

यावेळी उमेश दशराथी,जयेश ओसवाल, महावीर गाठ,संजय शेटे,सीमा शहा, रमेश जैन, शुभांगी तिरोडकर,सुजित चव्हाण आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन ताज मुलाणी तर आभार अमर वझलकर यांनी केले.

सरकार बदलले,नेते बदलले पण वीज दरवाढीची परिस्थिती मात्र तीच-संतोष मंडलेचा

  प्रदर्शनाच्या उद्घाटनांनर संतोष मंडलेचा यांनी पत्रकाराशी संवाद साधला. वीज  दरवाढ ही वीज कंपनीच करत आहे. प्रत्येक वर्षी दरवाढीबाबत आढावा घेतला जातो. पण यांवर्षी केलेली वीज दरवाढ ही उद्योगाला घातक आहे. उद्योजकांचा याला विरोध आहे.ग्राहकांना चांगला वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. या दरवाढीचा भार ग्राहकावर पडत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी शासनाशी असहकार करून पाठपुरावा करणार आहे. तसेच शेतकऱयांची सबसिडीही संशयीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

Related posts: